विरोधकांनी INDIA नाव का निवडलं?, जाणून घ्या राजकीय गणितं अन् अर्थ

विरोधकांनी INDIA नाव का निवडलं?, जाणून घ्या राजकीय गणितं अन् अर्थ

Opposition Party Meet : पुढील वर्षी लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार असून, देशभरात असलेली भाजपची लाट थोपवण्यासाठी विरोधकांनी मोट बांधली आहे. याचाच एक भाग म्हणून आज (दि.18) बंगळुरूमध्ये देशभरातील 26 विरोध पक्षांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत यूपीएचे नाव बदलून ‘INDIA’ करण्यात आले आहे. याचे पूर्ण नाव ‘इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुसिव्ह अलायन्स’ असे आहे. मात्र या नाव बदलण्याची विरोधकांना काय फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ( UPA changed name with INDIA in Opposition Party Meet Bengaluru Opposition can take Benefit of change )

सुरूवातील पाहूयात विरोधकांच्या आघाडीच्या या नव्या नावाचं फुलफॉर्म काय आहे?
बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या दोन दिवसीय बैठकीच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेत्यांनी नावावर चर्चा केल्याचे समजते. यूपीएऐवजी विरोधी पक्षांची नवीन ‘भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी’ (I-N-D-I-A) करण्यात आले. त्याचा फुलफॉर्म असा की,
I-Indian – भारतीय
N-National – राष्ट्रीय
D-Developmental/Democratic – विकासात्मक/लोकशाहीवादी
I-Inclusive – सर्वसमावेशक
A-Alliance – आघाडी.
असा या युपीएच्या नव्या नावाचा फुलफॉर्म आता विरोधीपक्षांच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या सोशल मिडीयावर सांगण्यात येत आहे.

अजितदादांचे धक्कातंत्र सुरुच; दिल्लीत जाताच पवारांचा मोहरा फोडला

‘इंडिया’ असं नाव का?
एका राजकीय विश्लेषकांनी यावर आपलं मत मांडताना सांगितले की, गेल्या दिवसांपासून देशात नावांवरून राजकारण करण्याची पद्धत सुरू झाली आहे. त्यात विशेषतः इंग्रजी शब्दांचे फुलफॉर्म्स त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जातात. भाजप त्यात पुढे आहे. त्यात त्यांनी विरोधकांची विविग नावं पाडली आहेत. त्यांची प्रचंड चर्चा देखील झाली. त्यामुळे विरोधकांनी देखील त्यांच्या नव्या नावामध्ये एक नाविन्यापूर्ण आणि सर्वसमावेशक अर्थ सांगितला आहे.

Opposition Meeting : मोदींच्या विरोधातील पैलवान कोण?; मुंबईत होणार शिक्कामोर्तब

या नावाचा फायदा विरोधकांना असा फायदा असा होणार आहे की, या नावाचा फुलफॉर्म देखील स्पष्ट करण्यात आल्याने आता भाजप त्याची खिल्ली उडवू शकणार नाही. तसेच ‘इंडिया’ हे देशाचं नाव असल्याने भाजपला यावरून विरोधकांवर निशाणा साधणे महागात पडू शकते. कारण त्यावरून टीका केल्यास आक्षेपार्ह शब्द वापरला गेल्यास जनतेत वेगळा संदेश जाऊ शकतो. विरोधकांनी यावर खूप विचार केला असल्याचे दिसत आहे.

दुसरीकडे या राजकीय विश्लेषकांनी सांगितले की, या नव्या नावाचा विरोधकांना निवडणुकांमध्ये पडणाऱ्या मतदानावर देखील होऊ शकतो. मात्र मतदानामध्ये फार फरक नाही पडणार असं देखील सांगण्यात येत. कारण लोक मतदान करताना विचार करतात की, कोणत्या आघाडी किंवा युतीमध्ये कोण-कोणते पक्ष आहेत. त्याचा विविध राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांपरत्वे वेगवेगळा प्रभाव पडू शकतो. असं सांगण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube