Opposition Meeting : मोदींच्या विरोधातील पैलवान कोण? मुंबईत होणार शिक्कामोर्तब

Opposition Meeting : मोदींच्या विरोधातील पैलवान कोण? मुंबईत होणार शिक्कामोर्तब

Opposition Meeting : भाजपच्या विरोधात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्यासाठी देशातील 26 विरोधी पक्षांची बैठक बंगळुरू संपन्न झाली. आता पुढील बैठक मुंबईत होणार असून, तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. 11 सदस्यीय समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीच्या सदस्यांची नावे मुंबईत जाहीर केली जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्लीत एक सचिवालय स्थापन केले जाईल. देश आणि देशातील लोकांचे रक्षण करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. यासाठी आम्ही मतभेद मागे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, एनडीए 30 पक्षांसोबत बैठक घेत आहे. मी भारतात इतके पक्ष ऐकले नाहीत. आधी त्यांनी एकही सभा घेतली नाही पण आता ते एकामागून एक (एनडीए पक्षांसोबत) बैठक घेत आहेत. पंतप्रधान मोदी आता विरोधी पक्षांना घाबरले आहेत. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आम्ही येथे जमलो आहोत.

बंगळुरूच्या बैठकीत विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव बदलले; ‘यूपीए’च्या ऐवजी ‘इंडिया’

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, ही लढाई भाजप आणि विरोधक यांच्यात नाही. देशाचा आवाज दाबला जात आहे, हा लढा देशासाठी आहे, म्हणून इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (इंडिया) हे नाव निवडले गेले. ही लढाई एनडीए आणि भारत यांच्यातील आहे. नरेंद्र मोदी आणि इंडिया यांच्यात लढत आहे. त्यांची विचारधारा आणि इंडिया यांच्यात संघर्ष आहे. आम्ही ठरवले आहे की आम्ही एक कृती आराखडा तयार करू आणि एकत्र आम्ही आमची विचारधारा आणि आम्ही देशात काय करणार आहोत याबद्दल सांगू, असे त्यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube