ज्या पुस्तकावरून गदारोळ ते पुस्तक घेऊन राहुल गांधी लोकसभेत, म्हणाले मोदींना….

जेव्हा चीनचे टँक्स कैलाश रेंजमध्ये आपल्या हद्दीत घुसले, तेव्हा जनरल नरवणे यांनी तात्काळ संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना फोन केला.

News Photo   2026 02 04T174028.930

ज्या पुस्तकावरून गदारोळ ते पुस्तक घेऊन राहुल गांधी लोकसभेत, म्हणाले मोदींना....

लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात (Rahul Gandhi) माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ हे पुस्तक चांगलच गाजलं. पुस्तकाचा संदर्भ देत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी पक्षासह प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा, संरक्षण मंत्री राजनाथ शिंह यांच्यावर थेट वार केले. दरम्यान, या पुस्तकाचा संदर्भ दिल्याने राहुल गांधींना सलग दोन दिवस लोकसभेत बोलू दिलं नाही. आज हेच पुस्तक घेऊन राहुल गांधी आज लोकसभेत आले. त्यावेळी ते म्हणाले पंतप्रधान आले तर त्यांना हे पुस्तक भेट देणार आहे.

माध्यमांशी संवाद साधताना, राहुल गांधी यांनी जनरल नरवणे यांचे पुस्तक हातात धरलं होतं. ते म्हणाले, देशातील तरुणांनी आणि प्रसारमाध्यमांनी जनरल नरवणे यांचे हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे. चीनने भारताच्या जमिनीवर ताबा मिळवला आहे, हे यात स्पष्टपणं म्हटलं आहे. पंतप्रधान म्हणतात तसं ‘कोणीही घुसलेलं नाही’ हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचंही हे पुस्तक सिद्ध करते असंही ते म्हणाले. लडाखमध्ये चीनने भारताची जमीन हडपली आहे, ही वस्तुस्थिती असल्याचा दावाही त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड घाबरलेत! एपस्टिन फाइलचं नाव घेत राहुल गांधींचा गंभीर आरोप

दरम्यान, या मुद्यावर पंतप्रधान मोदी चीनच्या गप्प का आहेत? आपले लष्करप्रमुख राहिलेल्या व्यक्तीने आपल्या पुस्तकात जे लिहिले आहे, त्यावर सरकार उत्तर का देत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. चीनशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यापासून सरकार पळ काढत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, चीनच्या टँक्सनी भारतीय सीमेत प्रवेश केला असताना पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांनी लष्करप्रमुखांना वाऱ्यावर सोडले होते, असा दावाही राहुल गांधींनी आज संसदेबाहेर बोलताना केला.

पुस्तकात काय?

जेव्हा चीनचे टँक्स कैलाश रेंजमध्ये आपल्या हद्दीत घुसले, तेव्हा जनरल नरवणे यांनी तात्काळ संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना फोन केला. त्यांनी विचारले की आपण काय करायचे? पण राजनाथ सिंह यांनी उत्तर दिले नाही. त्यांनी जयशंकर आणि एनएसए (NSA) यांच्याशी चर्चा केली, तरीही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे नरवणे यांनी लिहिल्याचं राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधानांवरही त्यांनी जबाबदारी झटकल्याचा आरोप केला.

पुस्तक कुठून आलं?

माजी लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे (निवृत्त) यांच्या ‘आत्मचरित्रा’बद्दल लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, “मला वाटते की ते परदेशात उपलब्ध आहे. ते परदेशात प्रकाशित झाले आहे. सरकार त्याला येथे प्रकाशित करू देत नाहीये. माझा असा विश्वास आहे, पुस्तक उपलब्ध आहे. हे पुस्तक कुठून आले असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता. ते कुठून आले असेल याचा तुम्ही विचार करा, असे राहुल गांधी म्हणाले.

Exit mobile version