Rahul Gandhi Citizenship Dispute Case : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी इलाहाबाद हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकते दाखल याचिका फेटाळली गेली आहे. न्यायालयाच्या पीठाने याचिकाकर्त्याला पुनर्विचार याचिका दाखल करण्याची परवानगी मात्र दिली आहे तसेच नवीन याचिका माघारी घेण्याच्या आधारावर फेटाळण्यात आली आहे.
खरंतर न्यायालयाच्या लखनऊ पीठाने 5 मे रोजीच या प्रकरणातील याचिकाकर्त्याची एक याचिका फेटाळली होती. नवी याचिका दाखल करताना काही नवीन प्रमाण सादर करण्याचा दावा करण्यात आला होता. जोपर्यंत या याचिकेवर निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान, याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयाच्या लखनऊ पीठात एक जनहित याचिका दाखल केली आहे. राहुल गांधींच्या नागरिक्ता विरोधातील ही याचिका सध्या रजिस्ट्रीत आहे. यावर आजच सुनावणी होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या स्वीकृतीनंतरच सुनावणीची तारीख निश्चित होईल.
BSF Jawan : सहावेळा फ्लॅग मीटिंग अन् 84 वेळा वाजली शिट्टी; BSF जवानाच्या सुटकेची इनसाईड स्टोरी
कर्नाटकातील एस. विग्नेश शिशिर यांनी ही याचिका दाखल केली होती. कोर्टाने पुढे सांगितले की फेटाळण्यात आलेल्या याचिकेत पुनर्विचार प्रार्थना पत्र दाखल करण्याचा पर्याय याचिकाकर्त्याला आहे. विग्नेश शिशर यांनी राहुल गांधींच्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित केले होते. या प्रकरणाचा सीबीआय तपास व्हावा अशी मागणी त्यांनी केली होती. राहुल गांधी यांच्याकडे युनायटेड किंगडमचे (United Kingdom) नागरिकत्व आहे असा दावा या याचिकेत करण्यात आला होता.
राहुल गांधींकडे ब्रिटिश नागरिकता आहे याचे माझ्याकडे पुरावे आहेत असा दावा याचिकाकर्चा विग्नेश शिशिर यांनी केला होता. राहुल गांधींच्या दुहेरी नागरिकत्वाच्या बाबतीत दोन वेळा तक्रारही केली होती. परंतु, यावर कोणतीच कारवाई झाली नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. यानंतर प्रकरण कोर्टात चाललं. न्यायालयाने याचिका फेटाळली आहे.