Rahul Gandhi Comment on Reservation : काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi ) सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. राहुल गांधी विविध संस्था आणि विद्यापीठांना भेट देत आहेत. यावेळी त्यांनी भारत, इथली सामाजिक-राजकीय परिस्थिती यासह उद्योग धंद्यांवरही भाष्य केलं आहे.
हरियाणात आप कमकुवत तरीही आघाडीसाठी काँग्रेसचा आग्रह; राहुल गांधींची स्ट्रॅटेजी काय?
राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमादरम्यान आरक्षण संपुष्टात आणण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, काँग्रेस पक्ष आरक्षण संपवण्याचा विचार तेव्हाच करेल जेव्हा भारतात आरक्षणाच्या बाबतीत निष्पक्षता असेल आणि आता तशी परिस्थिती नाही. वॉशिंग्टनमधील प्रतिष्ठित जॉर्जटाउन विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना राहुल यांनी हे विधान केल आहे.
#WATCH | Washington, D.C, USA: Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi says, "If you look at the Indian government there are 70 bureaucrats who run the Indian government, secretaries to the government of India…Out of 70 people there is one tribal, three Dalits, three OBCs… pic.twitter.com/ntXaYX0eyt
— ANI (@ANI) September 10, 2024