Rahul Gandhi on SIR in Bihar : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत (Gandhi) असलेल्या मतदार यादी फेरपडताळणी प्रक्रियेवर काँग्रेसने टीकास्त्र सोडलंय. मोठ्या प्रमाणात मतदारांना मतदानापासून वंचित ठेवून निवडणुकांमध्ये फेरफार करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहे, असा थेट आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.
‘ निवडणूक आयोग हा पूर्णपणे भाजपची ‘निवडणूक चोरी शाखा’ झाली आहे का, असा घणाघाती सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. ‘निवडणूक आयोगाकडून बिहारमध्ये मतदारयाद्यांची फेरपडताळणी म्हणजे मतचोरीचा प्रकारच उघड झाला आहे’, असाही आरोप त्यांनी केला. २२ वर्षांनंतर होणाऱ्या या पडताळणीमुळे अपात्र मतदारांची नावं कमी केली जातील, तपासणी होईल. कायद्यानुसार मतदान करण्यास पात्र असलेल्यांचा नव्याने समावेश केला जाईल, असा दावा निवडणूक आयोगाने केला आहे.
सॉरी, मी आता अजून जगू शकत नाही, सुसाईड नोटमध्य दोन प्रोफेसरची नाव घेत केली आत्महत्या
या प्रकरणावर बोलताना राहुल यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘निवडणूक आयोग बिहारमध्ये फेरपडताळणीच्या नावाखाली मते चोरताना रंगेहाथ पकडला गेला आहे. काम चोरीचे, पण नाव पडताळणीचे, अशी स्थिती आहे. हे प्रकरण जो उघड करेल त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होईल’, असंही गांधी यांनी ‘एक्स’वर हिंदीमध्ये लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसंच, ‘नोटबंदीचा सूत्रधार असलेल्या पंतप्रधानांनी ही मतदानबंदी घडवून आणली आहे.
सध्या सुरू असलेल्या प्रक्रियेमुळे नागरिकत्वाच्या कागदपत्रांअभावी कोट्यवधी पात्र भारतीय नागरिकांना मतदानापासून वंचित ठेवले जाईल,’ असा थेट घणाघाती आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केला आहे. काँग्रेसचे नेते रमेश यांनी माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांची मुलाखत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली. मतदारयादीची फडताळणी हा मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे कमी करून निवडणुकांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न आहे,’ असे रमेश यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.