Ravneet Singh Bittu On Rahul Gandhi : रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू (Ravneet Singh Bittu) यांनी काँग्रेसचे नेते (Congress) आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटणार आहे. राहुल गांधी हे देशातील नंबरचे एकचे दहशतवादी आहेत. ते शिख समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच ते भारतीय असल्याचे मानत नाहीत, असे विधान भाजपचे राज्यमंत्री बिट्टू यांनी केले आहे.
मनोज जरांगे यांचे वादळ शांत होणार? मुख्यमंत्री शिंदे घेणार भेट
रविवारी राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू हे भागलपूर येथे आले होते. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील दौऱ्याबाबत एका प्रश्नाला उत्तर देताना बिट्टू हे वादग्रस्त बोलले आहेत. काँग्रेस नेत्यांनी शिख समाजाला वेगवेगळ्या गटात विभागण्याचा प्रयत्न केला आहे. शिख समाज हा कोणत्याला राजकीय पक्षाशी जोडला गेलेला नाही. राहुल गांधी हे समाजामध्ये आग लावत आहे. ते एक नंबर दहशतवादी असून, त्यांच्यावर तर बक्षीस ठेवायला हवे, असे बिट्टू यांनी म्हटले आहे.
100 कोटी होता पगार, मस्कने राजीनामा घेतला; तरीही ट्विटरच्या माजी सीईओने केली कमाल..
राज्यमंत्री बिट्टू हे यावर थांबले नाही. राहुल गांधी हे भारतीय नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. राहुल गांधी हे भारतीय नाहीत. ते आपला जास्तीत जास्त वेळ हा देशाबाहेर घालवत आहेत. त्यांचे मित्र आणि कुटुंब हे तिकडे आहे. त्यामुळे त्यांचा आपल्या देशावर प्रेम नाही. ते बाहेर जाऊन देशाबाबत काहीही बोलत असतात. ते कधी ओबीसी, जातीबाबत बोलतात. ते समजदार नेते नाहीत. त्यांनी आधी मुस्लिम समाजाबाबत बोलत होते. ते आता शिख समाजाबाबत बोलत आहेत. देशात प्रत्येकी वेळी बंदुकीची गोळी, विमाने, ट्रेन उडविण्याचा गोष्टी करतात, ते राहुल गांधी यांना समर्थन करतात. त्यावरूनच राहुल गांधी हे देशातील नंबर एकचे दहशतवादी आहे. ते देशाचे सर्वात मोठे शत्रू आहे. त्यामुळे कोणावर पकडण्यासाठी बक्षीस ठेवायचे असले तर ते राहुल गांधी यांच्यावर ठेवा, असे बिट्टू यांनी म्हटले आहे.