Download App

राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर, इंग्लड दौरा ठरला होता वादग्रस्त

Rahul Gandhi Visit US: काँग्रेस नेते राहुल गांधी 31 मे रोजी एका आठवड्यासाठी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात 4 जून रोजी न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे भारतीय लोकांना संबोधित करणार आहेत. याशिवाय कॅलिफोर्नियातील एका विद्यापीठातील कार्यक्रमातही राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत.

राहुल गांधींचा शेवटचा विदेश दौरा चांगलाच चर्चेत होता. मार्चमध्ये ते केंब्रिज विद्यापीठात गेले होते. त्यादरम्यान त्यांनी लोकशाही आणि अल्पसंख्याकांच्या मुद्द्यांवरुन केंद्र सरकारला घेरले होते. केंब्रिज विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले होते की, संसदेतील आमचा माईक बंद केला जातो. याशिवाय केंद्र सरकार स्वायत्त संस्थांवर सातत्याने दबाव आणत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

कोणत्या विधानावर सर्वाधिक गदारोळ होता?
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला होता. पंतप्रधानांकडून भारताची संकल्पना उद्ध्वस्त केली जात आहे. ते देशावर एक विचार लादण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान काही लोकांना दुय्यम नागरिक मानतात. आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. आमचा माईक बंद केला जातो.

J. P. Nadda : पुण्यातून ठरणार भाजपची रणनीती; जे. पी नड्डा करणार नव्या टीमला मार्गदर्शन

याशिवाय केंद्र सरकार स्वायत्त संस्थांवर सातत्याने दबाव आणत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर दिल्लीत मोठा गदारोळ झाला होता. राहुल गांधींनी माफी मागावी यासाठी भाजपने संसदेत गोंधळ घातला होता.

Tags

follow us