Download App

चर्चा मोदींविषयी नाही, मणिपूरविषयी होती, बोलतांना मोदींना भानच नव्हतं; राहुल गांधींची सडकून टीका

  • Written By: Last Updated:

Rahul Gandhi :मणिपूर हिंसाचारावरून विरोधकांनी मोदींविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी काल उत्तर दिले. या उत्तराच्या भाषणात त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. मतदारांची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेसने गांधी हे नाव चोरलं. विरोधकांची इंडिया आघाडी नसून घमंडिया आघाडी आहे, असे ताशेरे त्यांनी ओढले. दरम्यान, आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. मोदींनी तब्बल 2 तास 12 मिनिटे केलं. मात्र, मणिपूर हिंसाचारवर मोदी फक्त 2 मिनिटं बोलले. आणि बाकी सगळं ते स्वत:विषयी बोलले. त्यांनाच चर्चा कुठल्या विषयावर होती, याचं भानच राहिलं नाही. ते दोन तास फक्त चेष्टा करत राहिले, अशी टीका त्यांनी केली. (Rahul Gandhi on Prime Minister Narendra Modi over loksabha speech)

आज राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. राहुल यांनी यावेळी बोलतांना मोदींवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींना काल संसदेत 2 तास 12 मिनिटं भाषण केलं. मात्र, या भाषणात मोदी मणिपूर हिंसाचारावर फक्त दोन मिनिटं बोलले. ते मणिपूरवर बोलताना हसत होते, चेष्टा करत होते.

मोदींना मणिपूर घटनेचं गांभीर्य नाही, आपल्या भाषणातून खिल्ली उडवली; राहुल गांधींची हल्लाबोल 

राहुल यांनी सांगितलं की, खरंतर काल मोदींजींनी केलेलं भाषण हे भारताविषयी, इथल्या प्रश्नांविषयी नव्हतचं. त्यांचं भाषण हे फक्त नरेंद्र मोदी या विषया भोवती होतं. ते आपली महत्वकांक्षा, राजनीती यावर बोलत होते. आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, असं सांगित राहिले. प्रश्न हा नाही की ते पंतप्रधान होतील की नाही हा नाही. तर मुद्दा असा आहे की, मणिपूर जळतं, तिथल्या महिलांवर अमानुष अत्याचार होत आहेत. मात्र, मोदींनी या प्रश्नांना बगल दिली. काल मोदी जे बोलले, ते त्यांनी संसदेत नाही, जाहिर भाषणात बोलायला हवं. त्यांना भानच राहिलं नाही की, चर्चा त्यांच्याविषय़ी नाही तर मणिपूरविषयी सुरू होती.

काल अधीर रंजन चौधरी यांनी निलंबित केलं. यावरही राहुल यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, आमच्यावर काहीही कारवाई केली, तरी आम्ही प्रश्न विचारणं बंद करणार नाही. निलंबित केल्यानं आमचं काम बदलत नाही. तुम्हीही काहीही करा आम्ही मागे हटणार नाही. आम्ही हिंसा कमी करण्यासाठी प्रयत्न करत राहू, असं राहुल यांनी सांगितलं.

 

Tags

follow us