‘नाक खुपसलं तर सोडणार नाही’; रोहित पवारांनी राम शिंदेंना दम भरला

Rohit Pawar Vs Ram Shinde : आमदार रोहित पवार(Rohi Pawar) आणि आमदार राम शिंदे(Ram Shinde) यांच्यातील काही नवा नाही. मतदारसंघातील विविध विकासकामांवरुन दोघांमध्ये खडाजंगी जुंपलेली असतेच. अशातच आता बसस्थानकाच्या मुद्द्यावरुन रोहित पवारांनी राम शिंदेंना दम भरला आहे. एमआयडीसीवरुन तर राजकारण केलं जातंय पण इतर विकासकामांमध्ये नाक खुपसलं तर संविधानिक पद्धतीने सोडणार नसल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत.
‘आप’ला आणखी एक धक्का; संजय सिंह यांच्यापाठोपाठ खासदार राघव चढ्ढाचेंही राज्यसभेतून निलंबन
रोहित पवार म्हणाले, राम शिंदे गेली 10 वर्षे आमदार होते तसेच पाच वर्ष कॅबिनेट मंत्री देखील होते. मात्र ते या ठिकाणी यायचे व हवेत गोळ्या झाडायचे, त्यांनी केवळ या प्रश्नांवर आश्वासनेच दिली आहेत. मात्र, सगळ्यांच्या सहकार्याने मी आमदार झालो व आमचे सरकार सत्तेत आले त्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच बस डेपो मी मंजूर करून घेतला.
पालकमंत्रीपदावरून दोन दादांमध्ये समेट?; ध्वजारोहणासाठी अजितदादा कोल्हापुरात जाणार
हा डेपो केवळ मंजूर न करता त्याला मोठा निधी देखील मंजूर करून घेतला. तसेच या डेपोचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. तसेच डेपोला बस मिळाव्यात यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा केली आहे. एमआयडीसी प्रश्नी राम शिंदेंनी जे राजकारण केले तसेच राजकारण ते बस डेपोच्या मुद्द्यात देखील करू शकतात, असा घणाघात रोहित पवार यांनी केला आहे.
लोकसभेतील अमित शाहांचे सर्व दावे खोटे; राहुल गांधींच्या मदतीसाठी ‘कलावती बांदूरकर’ मैदानात
शिंदेंना पवारांची विनंती :
राम शिंदे माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जसे एमआयडीसीसाठी कितीही प्रयत्न केले तरी ती होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. जे काही विकासकामे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर नाक खुपसलं तर लोक तुम्हाला सोडणार नाहीत, आम्ही देखील तुम्हाला संविधानिक पद्धतीने सोडणार नाही, असा इशारा रोहित पवार यांनी थेट राम शिंदे यांना दिला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कर्जत-जामखेड एमआयडीसीच्या मुद्द्यावरून राम शिंदे-रोहित पवार यांच्यामध्ये चांगलेच शाब्दिक वाद पेटले होते. यातच आता रोहित पवार यांनी कर्जत बस स्थानकाच्या मुद्द्यावरून शिंदेंना घेरलं आहे. यावेळी पवार यांनी शिंदेंवर शाब्दिक निशाणा साधला आहे.