Rahul Gandhi The H Files PC : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी नवी दिल्लीतील इंदिरा भवन येथे मतचोरीच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेत आहेत. “एच फाइल्स” शीर्षक असलेल्या या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी निवडणूक हेराफेरीचे गंभीर आरोप केले आहेत. बिहारमधील 121 विधानसभा जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान होण्याच्या काही दिवस आधी ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. यापूर्वी, काँग्रेसने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून एका पोस्टमध्ये राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचे वर्णन “हायड्रोजन बॉम्ब लोडिंग” असे केले होते.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि हरियाणामध्ये आम्हाला मतांची चोरी आढळली आहे. शिवाय, संपूर्ण राज्यात चोरी झाली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला गुरु नानक देव यांचे स्मरण केले. एच-फाईल्सबाबत ते म्हणाले की, हे एकाच विधानसभा मतदारसंघाबद्दल नाही. राज्यांमध्ये मतांची चोरी होत आहे.
हरियाणाच्या निवडणूक (Haryana Elections) इतिहासात पहिल्यांदाच पोस्टल बॅलेट आणि प्रत्यक्ष मतांचा निकाल वेगळा होता. पोस्टल बॅलेटमुळे काँग्रेसला (Congress) 76 जागा मिळाल्या, तर भाजपला फक्त 17 जागा. नेहमीच असे घडले आहे की पोस्टल बॅलेट आणि प्रत्यक्ष मतांची दिशा समान होती. पुढे बोलताना राहुल गांधी यांनी धक्कादायक दावा करत ब्राझीलच्या मॉडेलने हरियाणात 10 बुथवर 22 वेळा मतदान केला असा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना हरियाणात 25 लाख मते चोरीला गेली आहेत असा आरोप देखील लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.
पुढे राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत एका तरुणीचा फोटो दाखवला आणि या फोटोसोबत 22 ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी मतदान केल्याचे आरोप केले. राहुल गांधी म्हणाले की, या तरुणीने कधी सीमा नावाने तर कधी सरस्वती नावाने 22 मते टाकली. राहुल गांधींनी विचारले की, हरियाणाच्या मतदार यादीत ही ब्राझिलियन महिला काय करत आहे. हरियाणातील पाच श्रेणींमध्ये 25 लाख मते चोरीला गेली. त्यांनी श्रेणीनिहाय आकडेवारीही दिली आणि सांगितले की, 5 लाख 21 हजारांहून अधिक डुप्लिकेट मतदार सापडले आहेत. हरियाणात एकूण 2 कोटी मतदार आहेत. 25 लाख मते चोरीला गेली म्हणजे दर आठ मतदारांपैकी एक बनावट होता. त्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला असं देखील या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राज्यात पुन्हा आस्मानी संकट; पुढील पाच दिवस ‘या’ जिल्ह्यांमध्ये धो धो पाऊस
पुढे राहुल गांधी म्हणाले की, दलचंद हे उत्तर प्रदेश आणि हरियाणातील मतदार आहेत. त्यांचा मुलगाही हरियाणातील मतदार आहे आणि उत्तर प्रदेशात भाजपला मतदान करतो. भाजपशी संबंध असलेले हजारो लोक आहेत. मथुरा सरपंच प्रल्हाद यांचे नावही हरियाणातील अनेक ठिकाणी मतदार यादीत आहे. राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही हल्ला चढवला आणि म्हटले की, ज्यांच्याकडे घरे नाहीत त्यांच्या घरांचे क्रमांक शून्य नोंदवले जातात असा त्यांचा दावा होता.
राहुल यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान, निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ देखील दाखवण्यात आला, ज्यामध्ये बेघर लोकांच्या मतदार यादीत असलेल्या पत्त्यांबद्दल माहिती दिली जात होती. राहुल गांधी म्हणाले की, आम्ही उलटतपासणी केली त्यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त देशातील जनतेशी उघड खोटे बोलले.
हरियाणात जे घडले तेच बिहारमध्येही घडेल – राहुल गांधी
राहुल गांधी यांनी आरोप केला की, हरियाणामध्ये जे घडले तेच बिहारमध्येही घडेल. बिहारमधील मतदार यादीत घोटाळे झाले आहेत. त्यांनी दावा केला की मतदार यादी आम्हाला शेवटच्या क्षणी देण्यात आली. पत्रकार परिषदेदरम्यान राहुल गांधींनी बिहारमधील अनेक मतदारांना मंचावर आमंत्रित केले आणि दावा केला की त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यांनी सांगितले की, संपूर्ण कुटुंबांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. बिहारमध्ये लाखो लोकांची नावेही वगळण्यात आली आहेत. राहुल गांधी म्हणाले की, भारतातील सामान्य जनता आणि तरुणच सत्य आणि अहिंसेच्या माध्यमातून लोकशाही वाचवू शकतात.
