रमजान ईदच्या सुट्टीबाबत हरियाणा सरकारचा मोठा निर्णय! कर्मचाऱ्यांच्या सुट्टीवर येणार गदा

रमजान ईदच्या सुट्टीबाबत हरियाणा सरकारचा मोठा निर्णय! कर्मचाऱ्यांच्या सुट्टीवर येणार गदा

Ramajan Eid holidays Cancel Haryana governments decision : मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 मार्च रोजी मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण साजरा केला जाणार आहे. मात्र या दरम्यान हरियाणा सरकारने ईदची सुट्टी न देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामागचं कारण देखील सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

शिवरायांबद्दल बेताल वक्तव करणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा, अजामीनपात्र गुन्हा… उदयनराजेंनी केली अमित शाहांकडे मागणी

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी याबाबत आदेश काढला आहे. यामध्ये सांगण्यात आला आहे की, हरियाणामध्ये 31 मार्च 2025 रोजी येणारी रमजान ईदची सुट्टी ही गॅझेटेड हॉलिडे नसून रेस्ट्रिक्टेड हॉलिडे असणार आहे. त्यामुळे ईदची सुट्टी ही ऑप्शनल असणार आहे. यामागील कारण म्हणजे 31 मार्च हा दिवस फायनान्शिअल इयरचं क्लोजिंग असतं. तसेच शनिवार 29 मार्च त्यानंतर रविवार 30 मार्च या दोन्ही दिवशी सुट्टी असणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर २१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर! चंद्रकांत कुलकर्णींच्या नाटकातून पुनरागमन

त्यामुळे आता 2024 25 या आर्थिक वर्षाच्या व्यवहार पूर्ण करण्यासाठी ईदची सुट्टी ही ऑप्शनल असणार आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी एकाच वेळी सुट्टीवर न पाठवता काही कर्मचारी सुट्टीवर पाठवले जातील. त्याचबरोबर हा निर्णय केवळ हरियाणा सरकारनेच घेतला नाहीये. तर रिझर्व बँक ऑफ इंडियाने देखील 31 मार्चला काम करून सर्व सरकारी व्यवहार पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आर्थिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची सुट्टी पुढे ढकलण्यात आली आहे.

‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार?’ CM फडणवीसांनी केलं चांदीच्या आकर्षक ट्रॉफीचं अनावरण

त्याचबरोबर धार्मिक दृष्ट्या बघितलं तर जरी 31 मार्च सोमवारी असेल तरीदेखील दोन मार्च 2025 रोजी रमजानचा महिना सुरू झाला होता. हा महिना 29 ते 30 दिवसांचा असतो. तेवढे रोजा पूर्ण झाल्यानंतरच ईद साजरी केली जाते. त्याचबरोबर यासाठी 30 मार्चला ईद साजरी करण्यासाठी चंद्र दिसणं देखील गरजेचं आहे. मात्र 30 ऐवजी31 मार्चला जर चंद्र दिसला तर एक एप्रिल रोजी देखील ईद साजरी केली जाऊ शकते. जेणेकरून मुस्लिम बांधवांच्या सुट्टीवर गदा येणार नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube