नवी दिल्ली : सुरत न्यायालयाने राहुल गांधींना (Rahul Gandhi) दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. संसदेच्या नियमानुसार शिक्षापात्र खासदाराला आपले पद गमवावे लागले. त्यानंतर आज याच मुद्दयांवर आज राहुल गांधी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. त्या टीकेला भाजपचे केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी देखील एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी राहुल गांधीच्या पत्रकार परिषदेवर निशाना साधला.
राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केलाय. जाणूनबुजून त्यांनी हा अपमान केलाय. तर राहुल गांधी यांनी ही आजची पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा खोटं बोलंले आहेत. खोट बोलनं ही त्यांची सवय झाली आहे. परदेशात जाऊन ते भारतावर टीका करतात. तसेच पंतप्रधानांवरही आरोप करण्याची त्यांना सवय झाली आहे. असं देखील यावेळी केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.
तसेच ते पुढे बोलताना म्हणाले, ‘राहुल गांधींच राजकारण सरळ आहे. लोकांनी त्यांना मतदान केलं तर लोकशाही ठीक आहे. ते हारले तर लोकशाही धोक्यात आहे. ते जिंकले तर निवडणूक आयोग ठीक आहे. ते हारले तर निवडणूक आयोगाचा दोष. न्यायालयाने त्यांच्या बाजुने निकाल दिला तर ठीक नाही तर न्यायालय पक्षपाती ठरते. असं त्यांचं राजकारण आहे.’ अशी टीका रविशंकर प्रसाद यांनी केली.
Rahul Gandhi : अदानी वरच्या पुढच्या भाषणाची भीती म्हणून निलंबन; पत्रकार परिषदेमध्ये आरोप
‘तसेच त्यांची आजची पत्रकार परिषद एक ठरवून केलेली रणनिती आहे. त्यातून त्यांनी कसं बलिदान दिलं आहे. हे दाखवण्याचा प्रयत्न यातून केला गेला आहे. कारण कर्नाटक विधानसभेची निवडणूक आली आहे. त्यामध्ये या सहानुभूतीचा लाभ घेता येईल.’ असं देखील रविशंकर प्रसाद हे म्हणाले आहेत.