Download App

रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमांत बदल; प्रवासाच्या ‘इतके’ दिवस आधी करता येईल बुकिंग

Railway Ticket Reservation rule changed : भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग (Indian Railway) आणि आरक्षणाच्या नियमांत मोठा बदल (Ticket Reservation) केला आहे. आता रेल्वे तिकीटांची बुकिंग साठ दिवस अगोदरही करता येऊ शकणर आहे. आधी हा नियम 120 दिवसांचा होता. नवीन नियम 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत झालेल्या तिकीट आरक्षणावर या नवीन बदलांचा परिणाम होणार नाही. हा निर्णय घेण्यामागे नेमकं काय कारण आहे याचा खुलासा रेल्वेने केलेला नाही.

रेल्वेने सांगितले की 1 नोव्हेंबर 2024 पासून अॅडव्हान्स रिजर्व पिरियड दोन महिन्यांचा असेल. तिकीटांची बुकिंगही त्याच पद्धतीने करण्यात येईल. याआधीच्या 120 दिवसांच्या नियमांतर्गत 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत केलेल्या सर्व बुकिंगवर कोणताही परिणाम होणार नाही. टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. बऱ्याचदा रेल्वे गाड्या रद्द झाल्यास किंवा चार महिन्यांत प्रवाशांची फिरण्याची योजना रद्द झाल्यास प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तिकीटाचे पैसे परत मिळवण्यात मोठ्या अडचणी येतात. त्यामुळे रेल्वेने एआरपीच्या या नियमांत बदल केल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.

विदेशी प्रवाशांसाठी नियमांत बदल नाही

साठ दिवसांच्या अॅडव्हान्स रिजर्व पिरिएडच्या व्यतिरिक्त अन्य बुकिंग रद्द करण्याची परवानगी देण्यात येईल. यासह ज्या रेल्वे गाड्यांचा अॅडव्हान्स पिरिएड सुरुवातीपासूनच कमी आहे त्यावरही या नियमांचा परिणाम होणार नाही. यामध्ये गोमती एक्सप्रेस, ताज एक्सप्रेस या रेल्वेंचा समावेश आहे. या रेल्वेगाड्यांत सध्या आगाऊ आरक्षणासाठी वेळेची मर्यादा आधीच लागू करण्यात आली आहे. विदेशी प्रवाशांसाठी 365 दिवसांच्या मर्यादेच्या बाबतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Railway Budget 2024 : अहमदनगर-परळी मार्गासाठी 275 कोटींची तरतूद, आणखी नवे ट्रॅक कुठे?

 

follow us