Rajasthan BJP Manifesto: राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (Rajasthan Assembly Elections) भाजपने (BJP) गुरुवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी जयपूरमध्ये हा जाहीरनामा जारी केला. यापूर्वी भाजपने आपला निवडणूक जाहीरनामा तयार करण्यासाठी संकल्प यात्राही काढली होती, ज्यात प्रत्येक जिल्ह्यात आणि मतदारसंघात संकल्प रथ पोहोचला होता. दरम्यान, पक्षाच्या म्हणण्यानुसार हा जाहीरनामा तयार करण्यापूर्वी सर्वसामान्यांच्या इच्छा आणि समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या जाहीरनाम्याला संकल्प पत्र म्हटलं आहे.
‘ज्यांची चकली सरळ त्यांच्याच फराळाला मी जाणार’; लकेंचं नाव न घेता विखेंचा टोला
आपनो आगे राजस्थान संकल्प पत्र असं नाव असलेल्या जाहिरनामा जारी करतांना जयपूरमध्ये जेपी नड्डा यांनी कॉंग्रेसवर जळजळीत टीका केली. ते म्हणाले, काँग्रेस पक्ष गेल्या पाच वर्षांत पाच गोष्टींसाठी ओळखला जातो. कॉंग्रेसच्या काळात राज्यात भ्रष्टाचार, बहिणी, मुलींवर अत्याचार, पेपर फुटीच्या घटना, गरीब आणि मागासांवर अत्याचार आणि शेतकऱ्यांचा अवमान हेच झालं. गेहलोत सरकारनं राज्यातील जनतेचं केवळ आर्थिक शोषण केलं, अशी टीकास्त्र नड्डा यांनी डागलं. इतर पक्षांसाठी जाहीरनामा किंवा व्हिजन डॉक्युमेंट ही केवळ औपचारिकता आहे, परंतु भाजपसाठी हा विकासाचा रोडमॅप आहे.राजस्थानमध्ये आमचे सरकार आल्यास आम्ही परीक्षेचे पेपर फुटणे आणि इतर घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करू, असं नड्डा म्हणाले.
‘मराठ्यांनी तुमची बनेल अन् चड्डीपण..,’; जरांगे पाटलांनी बोर्ड फाडणाऱ्यांना सज्जड दम भरला
केंद्रीय मंत्री आणि अर्जुन राम मेघवाल यांनी दावा केला की भाजपचे “संकल्प पत्र (जाहिरनामा) हा इच्छा आकांक्षाची पेटी आहे. एक कोटीहून अधिक लोकांच्या सूचनांवर आधारित हा जाहिरनामा आहे. मेघवाल हे पक्षाच्या जाहीरनामा समितीचे निमंत्रकही आहेत.
भाजपने काय आश्वासने दिली?
– महिलांना केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाईल.
– राज्यातील शेतकऱ्यांच्या लिलाव झालेल्या जमिनीचा योग्य मोबदला देण्यासाठी नुकसान भरपाई धोरण लागू केले जाईल.
– मातृवंदनाची रक्कम 4,000 रुपयांवरून 8,000 रुपये करण्यात येणार आहे.
– लखपती दीदी योजनेअंतर्गत 6 लाखांहून अधिक ग्रामीण महिलांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल.
– पीएम उज्ज्वला योजनेंतर्गत सर्व गरीब कुटुंबातील महिलांना 450 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे.
– येत्या 5 वर्षात राज्यात अडीच लाख बेरोजगारांना नोकऱ्या देणार.
– आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना गणवेश इत्यादीसाठी 1200 रुपये वार्षिक मदत दिली जाईल.
– AIIMS आणि IIT च्या धर्तीवर राजस्थान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येतील.
– गव्हाचे उत्पादन 2700 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केले जाईल आणि एमएसपीवर बोनस दिला जाईल.
– लाडली प्रोत्साहन योजना सुरू केली जाईल, ज्या अंतर्गत प्रत्येक मुलीच्या जन्मावर 2 लाख रुपयांचा बॉन्ड दिला जाईल.
मुख्यमंत्री मोफत स्कूटी योजनेंतर्गत बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थिनींना स्कूटर देण्यात येणार आहेत.
– राजस्थानमधील पेपर लीक आणि इतर घोटाळ्यांच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येणार आहे.
– प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस ठाणे उघडणार, प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला डेस्क असेल. सर्व प्रमुख शहरांमध्ये अँटी रोमिओ पथके तयार करण्यात येणार आहेत.
– पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पाच लाख तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी पर्यटन कौशल्य अभ्यासक्रम सुरू केला जाईल.