‘ज्यांची चकली सरळ त्यांच्याच फराळाला मी जाणार’; लकेंचं नाव न घेता विखेंचा टोला

‘ज्यांची चकली सरळ त्यांच्याच फराळाला मी जाणार’; लकेंचं नाव न घेता विखेंचा टोला

Sujay Vikeh On Nilesh Lanke : अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचे खासदार सुजय विखे पाटील(Sujay Vikhe) आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके(Nilesh Lanke) यांच्यात शाब्दिक चकमक होत असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. अशातच आता पुन्हा एकदा खासदार सुजय विखे यांनी निलेश लंकेंचं नाव न घेता टोलेबाजी केली आहे. ज्यांची चकली सरळ त्यांच्याच फराळाला मी जाणार असल्याचा टोला खासदार सुजय विखे यांनी लंकेंना लगावला आहे. अहमदनगरमध्ये आयोजित बैठकीला विखे पाटलांनी हजेरी लावली. बैठकीनंतर विखेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

‘मराठ्यांनी तुमची बनेल अन् चड्डीपण..,’; जरांगे पाटलांनी बोर्ड फाडणाऱ्यांना सज्जड दम भरला

सुजय विखे म्हणाले, उत्तर व दक्षिण नगर जिल्हा असा आता करायला नको आमच्या पक्षातील आमदारांना आम्ही आता विनंती करू व आगामी काळामध्ये नगरमध्ये मोठमोठे नेते आणणार असल्याचं विखे यांनी नगर जिल्हा उत्तर दक्षिण वादावर भाष्य केलं आहे. तसेच ज्याची चकली सरळ त्याच्याकडेच फराळाला जाऊ, असा टोला त्यांनी आमदार लंकेचे नाव न घेता लगावला आहे.

Sushma Andhare : ..तर अद्वय हिरेंवरील कारवाया लगेच थांबतील; अंधारेंचा भाजपावर निशाणा

भाजपाच्या अनेक आमदारांनी तुमच्यावर टीका केली, यावर विचारलं असता टीका केली हे योग्य आहे पण दुसरीकडे आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नगरला येण्याची विनंती केली. मात्र, विमानतळ हे नगरमध्ये नव्हते ते शिर्डीला होते. अनेक नेते येतात त्यावेळेला ते विमानतळाचा विषय करतात. त्यामुळे आता त्यांनी तिथे येण्याचे मान्य केले म्हणून ते आले. नगर दक्षिण व नगर उत्तर असा वाद न करता आगामी काळामध्ये आपण एकत्र कसे राहू व नगरमध्ये मोठ्या व्यक्तींना कार्यक्रमाला कसे आणता येईल यासाठी निश्चितपणे तयारी केली जाणार असल्याचंही सुजय विखे पाटील म्हणाले आहेत.

Government Schemes : दीनदयाल उपाध्याय स्वयम हॉस्टेल स्कॉलरशिप योजना आहे तरी काय?

सध्या सरकार कुणबीचे दाखले देतंयं :
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनोज जरांगे पाटील एकत्रितपणे बैठका घेत आहेत. बैठकीमध्ये मनोज जरांगे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आता सध्या सरकार कुणबीच्या दाखले देत असल्याचं सुजय विखे यांनी स्पष्ट केलं आहे.

नगर जिल्हा पर्यटनाला चालना देणारा :
नगर जिल्ह्यात देशाच्या पंतप्रधानांपासून तर राज्यातील मंत्र्यांपर्यंत आणि जण या ठिकाणी येऊन गेले आहेत. एवढेच नाही तर शिवसेनेचे खासदार संजय राऊतसुद्धा नगर जिल्ह्यामध्ये येऊन गेले आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये अनेक जण येत असतात पार्थ पवारही त्यामुळे येणार असावे असं सुजय विखे म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube