Download App

Rajasthan Election 2023 : नागपूरमध्ये प्लॉट, दिल्लीत घर; मुख्यमंत्री गहलोतांची संपत्ती किती वाढली?

  • Written By: Last Updated:

Ashok Gehlot Net Worth : राजस्थान विधानसभा निवडणुकीची (Rajasthan Election 2023) रणधुमाळी सुरू आहे. या राज्यात काँग्रेस व भाजपमध्ये जोरदार टक्कर आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) हे काँग्रेसचे (Congress) मुख्य चेहरा आहेत. गहलोत यांनी जोधपूर जिल्ह्यातील सरदारपुरा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रतिज्ञापत्रातून त्यांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. त्यांच्याकडे जमीन, प्लॉट, घर, सोने ही संपत्ती आहे. परंतु एकही वाहन नसल्याचा उल्लेख त्यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे.

Pune News : 40 विद्यार्थ्यांना अचानक चक्कर; ‘या’ महविद्यालयात घडला धक्कादायक प्रकार

गहलोत यांच्याकडे 11 कोटी 68 लाखांची संपत्ती आहे. त्यात 2 कोटी 81 लाख रुपये इतकी जंगम मालमत्ता आहे. तर 8 कोटी 87 लाख रुपयांची स्थावर संपत्ती आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा त्यांची संपत्ती जवळजवळ दुप्पटीने वाढली आहे. 2018 च्या निवडणुकीत गहलोत हे 6. 53 कोटींचे मालक होते. टीव्ही, फ्रीज, एसी, आयफोनची किंमतीचा उल्लेखही प्रतिज्ञापत्रात आहे. मुख्यमंत्री गहलोत यांच्याकडे 15 लाख 20 हजार रुपयांचे सोने आहेत. त्यातील 14 लाख 90 हजार सोने त्यांच्या पत्नीच्या नावे आहेत. मागील निवडणुकीत त्यांच्याकडून 12 लाख रुपयांचे सोने होते. तर अर्धा तोळे सोने गहलोत यांच्या नावावर आहे.

BMC अन् शिंदे सरकारला हायकोर्टाचा दणका : मुंबईत सर्व बांधकामांवर बंदी, फटक्यांबाबतही इशारा

अशोक गहलोत यांच्या नावावर 8. 87 कोटींची स्थावर संपत्ती आहेत. त्यात सात कोटी रुपये किंमतीची शेत जमीन आहे. जोधपूरमध्ये दोन ठिकाणी जमीन आहे. त्याचबरोबर दोन ठिकाणी फ्लॉट (भूखंड) आहेत. एक प्लॉट नागपूरमध्ये आणि दुसरा प्लॉट जोधपूरमध्ये आहे. नागपूरच्या प्लॉटची किमत 15 लाख रुपये, तर जोधपूरचे प्लॉटची किंमत 23 लाख 55 हजार इतकी आहे. 2018 च्या निवडणुकीतही शेती व प्लॉटचा उल्लेख गहलोत यांनी केला होता. त्यावेळी जोधपूरमधील जमिनीचे किमत साडेतीन कोटी दाखविण्यात आली होती. ती आता दुप्पट झाली आहे.

एक घर दिल्लीत, दोन घरे जोधपूरमध्ये

गहलोत यांच्याकडे चार घरे आहेत. त्यातील तीन घरे गहलोत यांच्या, तर एक घर पत्नीच्या नावावर आहे. दिल्लीतील एक व जोधपूरमधील दोन घरे गेहलोत यांच्यावर नावावर आहे. जयपूरमधील घर पत्नीच्या नावावर आहे. या घरांची किंमत एक कोटी 47 लाख इतकी आहे.


पंधरा वर्षांपूर्वी किती संपत्ती ?

2008 ते 2013 या कालावधीत अशोक गहलोत हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांची संपत्ती एक कोटी सात लाख इतकी होती. 2013 च्या निवडणुकीत गहलोत यांची संपत्ती 1 कोटी 69 लाख इतकी होती. त्यानंतर ती वाढून 6 कोटी 53 लाख इतकी झाली होती. ती वाढून आता 11 कोटी 68 लाख इतकी झाली आहे.

Tags

follow us