Rajasthan Election 2023 : राजस्थानमधील काँग्रेसचे गेहलोत सरकार विधानसभा निवडणुकीत जनतेला आकर्षित करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. अनेक घोषणानंतर आता मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणखी नवीन सात आश्वासनांंची घोषणा केली आहे. यामध्ये महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप/टॅबलेट, 15 लाख रुपयांचा मोफत विमा इत्यादींचा समावेश आहे. एवढेच नाही तर सीएम गेहलोत यांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचे जाहीर केले आहे.
गेहलोत सरकारने आश्वासनांंची घोषणा केली
– शेणखत 2 रुपये प्रति किलो दराने खरेदी
– शासकीय महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप/टॅबलेट
– प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्लिश मीडियमचे शिक्षण देण्याची हमी
– 15 लाख रुपयांपर्यंतचा मोफत विमा
– जुनी पेन्शन योजना
– एक कोटी कुटुंबांना पाचशे रुपयांचे सिलिंडर
– कुटुंबातील महिला प्रमुखाला दहा हजार रुपये मिळतील
थोरल्या पवारांवर टीका, पण धाकट्या पवारांच्या घोटाळ्याचा उल्लेखही नाही; ठाकरेंची मोदींवर टीका
सीएम गेहलोत यांनी आधीच जुनी पेन्शन योजना लागू केले आहे. याशिवाय मुख्यमंत्री गेहलोत यांनी दोन दिवसांपूर्वीच प्रत्येक कुटुंबातील महिला प्रमुखाला वार्षिक 10,000 रुपये आणि 500 रुपयांत सिलिंडर देण्याची घोषणा केली होती.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आश्वासन दिले आहे की, काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास सरकारी महाविद्यालयात प्रथम वर्षात विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप किंवा टॅबलेट दिले जातील. दरम्यान ही योजना त्यांच्या सध्याच्या कार्यकाळातील बजेटचा एक भाग होती परंतु घोषणेपलिकडे या योजनेने प्रगती केली नाही. आता सीएम गेहलोत यांनी दावा केला आहे की, दुसऱ्यांदा सरकार आल्यावर ही योजना सत्यात येईल.
इंग्लिश मीडियमचे शिक्षण देण्याची घोषणा
संपूर्ण राजस्थानमध्ये मुलांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण दिले जाईल, असा काँग्रेसचा दावा आहे. पंचायत स्तरावरही याची अंमलबजावणी केली जाणार आहे. याशिवाय चिरंजीवी आरोग्य विमा योजनेंतर्गत लोकांना विम्याची हमी दिली जात आहे.