Rajasthan Local Body Elections : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्यानिवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसताना दिसत आहे. राजधानी जयपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या 57 पैकी 7 जागांचे निकाल जाहीर करण्यात आले असून काँग्रेसने 4 जागांवर बाजी मारली आहे तर भाजपला एक जागा मिळाली असून एका जागेवर असदुद्दीन ओवेसी आणि हनुमान बेनीवाल यांच्या आघाडीला विजय मिळाला आहे.
तर दुसरीकडे पंचायत समित्यांमध्ये देखील काँग्रेसने (Congress) मोठी आघाडी घेतली आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, जयपूरच्या (Jaipur) पंचायत समित्यांच्या मतमोजणीत काँग्रेसने 47 जाग जिंकल्या आहेत तर भाजपला (BJP) आतापर्यंत फक्त 16 जागा जिंकता आल्या आहेत. तर ओवेसी आणि हनुमान बेनीवाल (Hanuman Beniwal) यांच्या आघाडीला 16 जागांवर विजय मिळाला आहे.
It’s a Congress tsunami in Rajasthan local body elections⚡Biggest Congress stronghold in India, bigger than Karnataka/Kerala, yet often lost due to infighting & local issues. Just want Gehlot-Pilot-Dotasra united during Assembly & LS elections. Congress can then sweep the state https://t.co/s5oVv7AfS8
— Akshay (@iAkshayRPillai) November 20, 2026
मुख्यमंत्री भजनलाल शर्मालाही धक्का
निकालानुसार 9 पंचायत समित्यांमध्ये भाजपचे खातेही उघडलेले नाही. विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्षा रमा चोप्रा यांचाही पराभव झाला आहे. तर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma) यांच्या सांगानेर विधानसभा मतदारसंघात हुनमान बेनीवाल यांच्या पक्षाला सर्वाधित 5 जागा मिळाल्या आहेत. भाजपला दोन तर काँग्रेसला एक जागा मिळाली आहे.
शक्ती कपूर यांच्याकडून लेक श्रद्धा कपूरच्या मेहनतीचं भरभरून कौतुक! म्हणाले अभिमानाने…
निकालानुसार, 149 पंचायत समित्यांपैकी 201 जागांचे कल हाती आले असून त्यांपैकी 102 पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे तर भाजपला आतापर्यंत 71 पंचायत समित्यांमध्ये आघाडी मिळाली असून अपक्ष आणि इतर पक्ष 28 जागांवर आघाडीवर आहे.
