India Vs Pak : काल (दि. 7 मे) भारतीय सैन्याने पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक (Air strike) केला. या हल्ल्यामुळे पाकिस्तान चांगलाच बिथरला असून पाकिस्तान (Pakistan) कधीही भारतावर हल्ला करू शकतो. पण, भारतही पाकला प्रत्युत्त रेण्यासाठी कोणतीही कसर सोडताना दिसत नाही. राजस्थानमध्ये सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली असून संशयास्पद हालचाली दिसताच गोळीबार करण्याचे आदेश सुरक्षा दलांना देण्यात आले.
Wada Chirebandi : ‘वाडा चिरेबंदी’ ला अमेरिकेत प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद
पाकिस्तानेच पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी खून की हर बूंद का बदला लेंगे, असं म्हणत पाकिस्तानी सैन्याला कारवाई करण्याची पूर्ण मोकळीक दिली. पाकच्या हवाई हल्लाचा पंजाब, गुजरात आणि राजस्थान या सीमेला लागून असलेल्या राज्यांना सर्वाधिक धोका आहे. त्यामुळं राज्यांमध्ये सैन्याकडून विशेष तयारी केली जाते. पंजाब आणि इतर सीमावर्ती राज्यांप्रमाणे, राजस्थानमध्येही सैन्याला सतर्क ठेवण्यात आळं.
राजस्थान आणि पंजाबमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला. येथे क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली सक्रिय करण्यात आली. तसेच संशयास्पद हालचाली दिसताच सुरक्षा दलांना दिसताच गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले. पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही कारवाईसाठी स्थानिक अधिकारी सज्ज आहेत. सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक मेळाव्यांवर बंदी घालण्यात आली.
तसेच बिकानेर, श्रीगंगानगर, जैसलमेर, बारमेर येथे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत आणि सर्व परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
१०३७ किलोमीटरची सीमा सील
राजस्थानची पाकिस्तानशी असलेली १०३७ किलोमीटरची सीमा सील करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, जोधपूर, किशनगड, बिकानेर विमानतळांवरील उड्डाणे ९ मे पर्यंत बंद करण्यात आली आहेत.
भारताच्या ऑपरेशननं बांग्लादेशही घाबरला; चीनकडून ‘या’ फायटर जेट्सच्या खरेदीचा प्लॅन
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम क्षेत्रात लढाऊ विमाने सतत उड्डाण करत आहेत. सुखोई ३० एमकेआय गंगानगर ते कच्छ पर्यंत लढाऊ विमाने गस्त घालत आहे.
दुसरीकडे, सीमावर्ती गावांना सतर्क ठेवण्यात आलं. तसेच राज्यात मॉक डिफेन्स ड्रिल आणि ब्लॅकआउट अलर्टचे आदेश जारी करण्यात आले. जैसलमेर आणि जोधपूरसह सीमावर्ती भागात मध्यरात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत ब्लॅकआउट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.