Video: ‘अल्लाह हमारी हिफाजत करे’, पाकिस्तानच्या संसदेत धाय मोकलून रडला खासदार

  • Written By: Published:
Video: ‘अल्लाह हमारी हिफाजत करे’, पाकिस्तानच्या संसदेत धाय मोकलून रडला खासदार

Shahbaz Sharif MP & Former Pakistani Major Tahir Iqbal Cried In Pakistani Parliament : भारताने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये (Pakistan) भीतीचे वातावरण आहे. भारत पुन्हा हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानला असून, यात भीतीत पाकिस्तानचा खासदार संसदेत ढसाढसा रडल्याचे समोर आले आहे. पीएमएलएनचे (पाकिस्तान मुस्लिम लीग-एन) खासदार ताहिर इक्बाल असे पाकिस्तानच्या संसदेत धाय मोकलून रडलेल्या खासदाराचे नाव आहे. इक्बाल हे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या पक्षाचे खासदार आहेत. संसदेत संबोधि करताना इक्बाल यांनी अल्लाह आपले रक्षण करो असे म्हटले आहे.

ब्रेकिंग : भारताच्या हल्ल्यात रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त, संध्याकाळी होणार होता सामना

रडलेला खासदार पाक सैन्यात होते मेजर

संसदेत भाषण देताना रडणाऱ्या व्यक्तीचे नाव ताहिर इक्बाल आहे. ताहिर इक्बाल हे पाकिस्तान मुस्लिम लीग-एनचे खासदार आहेत. एवढेच नव्हे तर, इक्बाल हे पाकिस्तानी सैन्यात मेजरही राहिले आहेत. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये इक्बाल आम्हाला भारताकडून होणाऱ्या हल्ल्यांपासून वाचवा अशी विनवणीही करतान दिसून येत आहे. सध्या इक्बाला यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सैन्य, नागरिक आणि खासदारांच्या मनात भीतीचं काहूर माजल्याचे इक्बाल यांच्या व्हिडिओतून अधोरेखित होत आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारताने पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमध्ये असलेले सुमारे 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहे.

आपल्याकडे खूप कमतरता

पुढे संसदेत बोलताना ताहिर इक्बाल म्हणाले की, मी सर्वांना एकत्र चालायला आणि देवाची प्रार्थना करायला सांगेन. अल्लाह या देशाचे रक्षण करो. आपल्याकडे खूप कमतरता असून आपण असहाय्य आहोत. आपण दोषी आहोत. अल्लाह आम्हाला माफ करो. आपण मोठे गुन्हेगार आहोत असेही ताहिर इक्बाल यांनी म्हटले आहे.

Operation Sindoor : आपण भारताचं एकही मिसाईल रोखू शकलो नाही, पाकिस्तानी तरूणाने काढले आपल्याच देशाचे वाभाडे

पाकिस्ताननकडून भारतात हल्ला करण्याचा प्रयत्न

ऑपरेशन सिंदूरनंतर चवताळलेल्या पाकिस्तानकडून काल रात्री (दि.7) भारताच्या 15 शहरांमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात ७ शहरे पंजाबमधील होती. पण भारताच्या एस-४०० ने पाकिस्तानचे क्षेपणास्त्र आकाशातच नष्ट केले.

‘ऑपरेशन सिंदूर’ सुरूच; 100 दहशवाद्यांचा खात्मा

ऑपरेशन सिंदूर मध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा भारत सरकारने केला आहे. सरकारने असेही नमूद केले की, ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) अजूनही सुरू असून, यात ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची संख्या वाढू शकते असे केंद्राने स्पष्ट केले आहे. तसेच सिंदूर पार्ट 2 अद्याप बाकी असल्याचेही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी दिला आहे. ते ऑपरेशन सिंदूरनंतर आयोजित सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube