Exit Poll 2023 Rajsthan : देशातल्या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाची तारीख आता जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर विविध राज्यांत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून निकालांचे निष्कर्ष समोर आले आहेत. राजस्थान निवडणूक निकालाचे ओपिनियन पोल(Exit Poll 2023 Rajsthan ) धक्कादायक आले आहेत. Aaj Tak Axis च्या आकडेवारीनूसार राजस्थानात काँग्रेसला 86-106 जागा तर भाजपला 80-100 जागा मिळणार असल्याचे समोर आले आहेत. तसेच इतर अपक्ष उमेदवारांच्या कोट्यात 9 ते 18 जागा मिळणार आहेत.
साठ वर्षांनंतर मणिपुरात शांतता; CM बिरेन सिंह यांच्याकडून मोदी, शाहांचे आभार
काही दिवसांपूर्वी सीवोटरच्या सर्वेक्षनूसार राजस्थानात सर्वाधिक मताधिक्य भाजपला मिळणार आहे. राजस्थानात भाजपला 45 टक्के तर काँग्रेसला 42 टक्के तर इतर उमेदवारांना 13 टक्के मताधिक्य मिळणार असल्याचं दिसतयं. राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबरला मतदान पार पडलं आहे. या निवडणुकीचा निकाल येत्या 3 डिसेंबरला लागणार आहेत. 3 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजल्याासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
राजस्थानच्या एकूण राजकारणात काँग्रेसचं वर्चस्व अधिक काळ आहे. भाजपकडून राजस्थान जिंकण्यासाठी अनेक शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे याच असणार असल्याचं सांगितल जात होतं मात्र, वसुंधरा राजे यांची अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली नव्हती. तरीही निवडणुकीत एकदिलाने काम करुन वसुंधरा राजे निवडणुकीला सामोरं गेल्या आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वात काँग्रेसने निवडणुका लढवल्या आहेत. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील संघर्षाची ठिणगी निवडणुकीआधी दिसून आली मात्र, पायलट आणि गेहलोत यांनी पक्षाचा आदेश मानून एकत्रितपणे निवडणूक लढवली आहे. त्यामुळे आता येत्या 3 डिसेंबरला राजस्थानात कोणाची सत्ता येणार? याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. अद्याप सीवोटरसह इतरांचा ओपिनियन पोल अद्याप जाहीर झालेला नसून थोड्याच वेळात हा पोल जाहीर होणार आहे.