Sudha Murthy in Rajya Sabha : इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती यांच्या (Sudha Murthy) राज्यसभेतील पहिल्याच भाषणाची तुफान चर्चा होत (Rajya Sabha) आहे. पहिल्याच पण अत्यंत प्रभावी अशा भाषणानं त्यांनी अनेकांची मनं जिंकली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान सुधा मूर्ती यांनी अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
कोरोनाच्या काळात देशात ज्या पद्धतीने लसीकरण अभियान चालवण्यात आले होते त्याच पद्धतीने महिलांना गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचविण्यासाठी लसीकरण अभियान चालवले पाहिजे. महिलांमध्ये या आजाराचं प्रमाण अतिशय वेगाने वाढत चाललं आहे. या आजारापासून संरक्षण करण्यासाठी किशोरावस्थेत लसीकरण केले पाहिजे.
मविआचा प्लॅन उलटणार की महायुतीला धक्का देणार? विधानपरिषदेचं गणित कुठे फसणार..
आपली सामाजिक व्यवस्थाच अशी आहे ज्यामुळे महिलांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. ज्यावेळी त्या रुग्णालयात जातात तेव्हा हाच सर्वाइकल कॅन्सर तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात पोहोचलेला असतो. त्यामुळे महिलांना या आजारातून बाहेर काढणं शक्य होत नाही. कोविड काळात देशभरात लसीकरण अभियान चालवण्यात आले. मग अशाच पद्धतीने सर्वाइकल कॅन्सरविरोधी लसीकरण अभियान चालवता येणार नाही का असा सवाल खासदार सुधा मूर्ती यांनी उपस्थित केला.
यानंतर त्यांनी पर्यटन क्षेत्राचा उल्लेख केला. लोक नेहमीच अजंठा, एलोरा आणि ताज महाल सारख्या पर्यटन स्थळांना भेटी देत असतात. भारतात अशी 42 वारसा स्थळे आहेत ज्यांचा जास्त प्रचार झाला नाही आणि या ठिकाणांची लोकांनाही फारशी माहिती नाही. दक्षिण भारतातच अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे. त्रिपुरातील उनाकोटी बद्दल कुणालाच माहिती नाही. हे स्थळ साडेबारा हजार वर्षांपेक्षाही जास्त प्राचीन आहे.
गुजरातमधील लोथल आणि धौलावीरा, मध्य प्रदेशातील मांडूचा किल्ला.. काय नाही आपल्या देशात.. आता आपल्याला याचा प्रचार प्रसार केला पाहिजे. या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. याबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण केली पाहिजे असे राज्यसभेच्या खासदार सुधा मूर्ती आपल्या भाषणात म्हणाल्या.
Adarsh Scam: अशोक चव्हाण भाजपचे ‘आदर्श’नेते, काँग्रेस नेत्याने राज्यसभेत चव्हाणांना डिवचलं
दरम्यान, सुधा मूर्ती यांनी भाषणात ज्या दोन महत्वाच्या मागण्या केल्या त्यामुळे सोशल मीडियावर त्यांचं कौतुक होत आहे. या मागण्यांबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.