Raksha Khadse meets Union Home Minister Amit Shah issue of alleged audio clip raised : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये एकच चर्चा आहे ती भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या भाजपमधीलच विविध नेत्यांशी फोनवर बोललेल्या वादग्रस्त ऑडिओ क्लिपची. ज्यामध्ये कधी महिला नेत्यांबाबत आक्षेपार्ह तर कधी केंद्रीय मंत्र्यांबाबत वादग्रस्त संवादाच्या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. त्यात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत काही आक्षेपार्ह बोलल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातून भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यानंतर आता रक्षा खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला गेल्या होत्या. त्या या कथित ऑडिओ क्लिपच्या विषयीच शाहंना भेटल्या का? त्यांनी याबाबत शाहंकडे तक्रार केली का? अशा एक ना अनेक चर्चांना उधान आले आहे…
नेमकं प्रकरण काय?
भाजपचे माजी महामंत्री आणि उत्तर महाराष्ट्राचे संघटक म्हणू काम पाहणारे विजय चौधरी यांच्या अनेक ऑडिओ क्लिप गेल्या काही दिवसांत व्हायरल झाल्या त्यात एक आक्षेपार्ह क्लिप केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत असल्याचा दावा करण्यात आला होता. या कथित क्लिपमध्ये विजय चौधरी हे मंत्री गिरीश महाजन यांच्याशी बोलत असल्याचा दावा कऱण्यात आला आहे. या संभाषणाची सुरूवात शिवागाळ करत होते.
पुढे यामध्ये म्हटलं आहे की, रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे हे एकच आहेत. त्यामुळे रक्षा खडसेंचा भाजपला काहीही उपयोग होणार नाही. फडणवीस आणि भाजप विरोधात बोलणाऱ्या एकनाथ खडसेंच्या विरोधात रक्षा खडसे एक शब्दही बोलत नाहीत. त्यांचं मंत्रीपद काढा. त्यावर गिरीश महाजनांनी देखील चौधरी यांना खडसेंचं मंत्रीपद काढण्यावर सकारत्मक प्रतिसााद देत आहेत. त्यामुळे आता रक्षा खडसे यांचं मंत्रिपद जाणार का? अशा चर्चांना उधाण आहे.
या ऑडियो क्लिपच्या व्हायरल होण्याच्या दरम्यानच आता रक्षा खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला गेल्या आहेत. त्या या कथित ऑडिओ क्लिपच्या विषयीच शाहंना भेटल्या का? त्यांनी याबाबत शाहंकडे तक्रार केली का? अशा एक ना अनेक चर्चांना उधान आले आहे. त्यामुळे आता पुढे काय होते. अमित शाह हे संबंधितांवर कारवाई करणार का? रक्षा खडसेंचं मंत्रीपद जाणार की राहणार त्यांना अभय मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
