Ayodhya : प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी संपूर्ण देशात अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर, मोदी सरकारने जारी केला आदेश

Ram Mandir Inauguration : राम मंदिराच्या (Ram Mandir)उद्घाटनाची जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच आता केंद्र सरकारने (Central Govt)आज गुरुवारी (दि.18) मोठी घोषणा केली. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह (Union Minister of State Jitendra Singh)यांनी सांगितले की, 22 जानेवारीला रामलल्लाच्या अभिषेकदिनी सरकारी कार्यालये अर्धा दिवस बंद राहतील. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळणार आहे. प्राणप्रतिष्ठा […]

Ayodhya Ram Mandir

Ayodhya Ram Mandir

Ram Mandir Inauguration : राम मंदिराच्या (Ram Mandir)उद्घाटनाची जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच आता केंद्र सरकारने (Central Govt)आज गुरुवारी (दि.18) मोठी घोषणा केली. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह (Union Minister of State Jitendra Singh)यांनी सांगितले की, 22 जानेवारीला रामलल्लाच्या अभिषेकदिनी सरकारी कार्यालये अर्धा दिवस बंद राहतील. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळणार आहे.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी PM मोदींनी प्रसिद्ध केले राम मंदिरावरील टपाल तिकीटे, जाणून घ्या खासियत

श्रीराम भक्तांच्या भावना लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची देशभरात जोरदार तयारी सुरु आहे.

सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे की, अयोध्येतील रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण भारतात साजरी केली जाईल. सरकारी कर्मचार्‍यांना उत्सवात सहभागी होण्यासाठी सक्षम करण्यासाठी, भारतभरातील सर्व केंद्र सरकारची कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापने 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ACB Raid : अनेक धक्के सहन केलेत, काही फरक पडत नाही; राजन साळवींनी स्पष्ट सांगितलं

त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या स्मरणार्थ टपाल तिकीट आणि जगभरातील प्रभू रामावर जारी केलेल्या टपाल तिकिटांचे पुस्तक प्रसिद्ध केले. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, राम, सीता आणि रामायण यांची समाज, जात, धर्म आणि प्रदेशाच्या सीमांच्या पलीकडे आहे. ते सर्वांना जोडतात.

राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गोवा, हरियाणा आणि छत्तीसगडमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Exit mobile version