सोयाबीन उत्पादकांना केंद्राचा दिलासा; 13 लाख टन सोयाबीन खरेदी करणार

सोयाबीन उत्पादकांना केंद्राचा दिलासा; 13 लाख टन सोयाबीन खरेदी करणार

Buy soybeans : राज्यातील सोयाबीन शेतकरी उत्पादकांना (Buy soybeans) दिलासा मिळालेला आहे. केंद्र सरकारने पुढील ९० दिवसात १३ लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेलं सोयाबीन ‘नाफेड’ (Nafed) आणि एससीसीएफच्या खरेदी केंद्रांवर खरेदी केले जाणार आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ४,८९२ प्रत्येक क्विंटल इतकी निश्चित केलेली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे.

केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ही ४,८९२ रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे. राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी व त्यांचे बाजारभाव पडल्याने नुकसान होऊ नये या दृष्टीने हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता द्यावी, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. तसेच, या संदर्भात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी संपर्कात होतो, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

हरियाणात भाजपकडून मोठा निर्णय, विनेश फोगटविरोधात ‘कॅप्टन’ ला उमेदवारी जाहीर

राज्य शासनाने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. यासाठी राज्य सरकारने ४,२०० कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून दिले असून, येत्या दोन-तीन दिवसांत या अनुदानाचे थेट वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मिळेल लाभ केंद्र सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार असल्याचेही मुंडे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube