ACB Raid : अनेक धक्के सहन केलेत, काही फरक पडत नाही; राजन साळवींनी स्पष्ट सांगितलं
Rajan Salvi ACD Raid : अनेक धक्के सहन केले आहेत, असल्या धक्क्यांनी काही फरक नसल्याचं स्पष्ट शब्दांत ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील निवासस्थानी एसीबीच्या (ACB) पथकाने धाड मारली आहे. यावेळी पथकाकडून राजन साळवींसह त्यांच्या भावाच्या घराची झडती घेण्यात आली आहे. तसेच पत्नी आणि मुलावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर राजन साळवींनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
राजन साळवी म्हणाले, मागील 40 वर्षांपासून मी शिवसेनेत काम करीत आहे, त्या काळात शिवसेना सोडून अनेकजण गेले आहेत. पण त्यावेळीही आम्ही बाळासाहेबांसोबतच होतो. शिंदे गटाचा काही विषय काढून नका, शिंदे गटात जायचं असतं, तर तेव्हाच गेलो असतो, माझ्याबद्दल काही आक्षेप असेल तर माझ्यावर कारवाई करा पण पत्नी आणइ मुलाला यामध्ये घेऊ नका. पण दुर्देवाने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीमध्ये जनता त्यांना जागा दाखवून देणार असल्याचा इशारा साळवींनी दिला आहे.
‘आधी मॅच टाय, सुपर ओव्हरही टाय नंतर टीम इंडियाच विनर’; भारत-अफगाणिस्तान सामन्यात क्रिकेटचा थरार
तसेच नगरसेवकपासून ते आमदार असं मागील अनेक वर्षांपासून मी जनतेत काम करीत आहे. जनतेकडून मला प्रेम मिळत आहे. या कारवाईनंतर आम्ही अटकपूर्व जामिनासाठी जाणार नसून कारवाईला सामोरं जाणार आहोत. असे अनेक धक्के आम्ही सहन केले आहेत, असल्या धक्क्यांनी काही फरक पडत नसल्याचंही राजन साळवींनी विरोधकांना ठणकावून सांगितलं आहे.
आतापर्यंत राजन साळवे यांनी सहा वेळा अलिबागमधील एसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावली होती. तर अर्धा तासाहून जास्त वेळापर्यंत साळवी यांच्या घरामध्येही झडती सुरू आहे. यावेळी राजन साळवे देखील काही वेळातच या निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी सांगितलं की, या एसीबीच्या पथकाचे मी स्वागत केलं आहे. अँटी करप्शन ब्युरोने नोटीस दिल्यानंतरच मला हे अपेक्षित होतं की, अशाप्रकारे हे पथक आमच्या घरापर्यंत पोहोचेल. अशा प्रकारची चौकशी होणार याची कुण कुण अगोदरच लागली होती. असं म्हणत आपण साळवी यांनी दोषी आढळणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.