ठाकरे गटाला कोकणात खिंडार! अखेर राजन साळवींच्या हाती धनुष्यबाण
![ठाकरे गटाला कोकणात खिंडार! अखेर राजन साळवींच्या हाती धनुष्यबाण ठाकरे गटाला कोकणात खिंडार! अखेर राजन साळवींच्या हाती धनुष्यबाण](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2025/02/Untitled-design-1_V_png--1280x720-4g.webp)
Rajan Salvi entered in Shivsena with Eknath Shinde : अखेर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे. बुधवारी 12 फेब्रुवारीला त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश निश्चित झाला होता. आज दुपारी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे.
सारखीच बडबड…राऊतांना काउंसलिंगची गरज, शिवसेना नेत्या शायना एनसींचा हल्लाबोल
गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे नारााज असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली होती. त्यानंतर त्यांनी आता ठाकरे गटाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाण्यामध्ये आज 13 फेब्रुवारीला दुपारी वाजता उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे. या पक्षप्रवेशानंतर कोकणात काय समीकरणं बदलू शकतात. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पवारांशी आघाडी करताना विचार करायला हवा होता, आता पक्ष…; माजी आमदाराचा ठाकरेंना घरचा आहेर
लांझा, राजापूर आणि साकरता या भागामध्ये या विधानसभा मतदारसंघाच राजन साळवी यांनी जवळपास तीन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी ते हाडाचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी शिवसेनेत कार्यकर्ता म्हणून त्यांच्या राजकीय कारकीर्दी सुरू केली आहे. त्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. ते मुळचे रत्नागिरीचे आहेत. मात्र त्यांनी कोकणात प्रभावी काम केले आहे. त्यामुळे शिंदेना हे सर्व तळागळातील कार्यकर्ते मिळाले आहेत.
आदित्य ठाकरेंची दिल्लीत हुजरेगिरी, आजोबांचं तरी स्मरण ठेवा; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
यावेळी बोलताना राजन साळवी यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. ते म्हणाले की, मी जुलै पासून शिंदेंच्या संपर्कात होतो. आज अखेर तो प्रवेशाचा दिवस उजाडला. तसेच यावेळी त्यांनी विनायक राऊतांवर पुन्हा एकदा टीका केली. साळवी म्हणाले की, गेली 38 वर्ष मी शिवसेना पक्षाचं काम करत आहे. गेली तीन टर्म आमदार म्हणून काम केलं. पाच वेळेस विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. 2006 मध्ये मी पराभूत झालो. पण 2024 मधील पराभव माझ्या जिव्हारी लागला.