Download App

Ram Mandir : अडवाणींनी रथयात्रा काढली अन् राम मंदिर निर्माणची लाट पसरली…

  • Written By: Last Updated:

Ram Mandir : अयोध्येतील (Ayodhya Ram Mandir) भव्य राम मंदिराच्या गर्भगृहाची प्राण-प्रतिष्ठा आणि अभिषेकासाठी 22 जानेवारी 2024 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे. मात्र या राम मंदीरांचं स्वप्न पाहिलं ते विश्व हिंदू परिषदेने आणि त्याची पायाभरणी केली ती भाजपचे ज्येष्ठ नेते लालाकृष्ण अडवाणी. ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय हे राम मंदीर आंदोलनाचा इतिहासच अपूर्ण आहे. काय आहे हा इतिहास? जाणून घेऊ सविस्तर…

VIDEO: कडक मराठीवरील गावरान मेवाचे ‘दाजी’ आलेत ! नवीन भाग बघा…

ही गोष्ट सुरू होते 1984 ला 1975 ला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घोषित केलेल्या आणीबाणीच्या विरोधात संपूर्ण विरोधी पक्ष एकत्र जनता पार्टी स्थापन केली होती. यामध्येच 1951 ला डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्थापन केलेल्या जनसंघाचाही समावेश होता आणि याच जनसंघाचे लालकृष्ण अडवाणी हे सदस्य होते. मात्र 1977 ला पक्षामध्ये कलह निर्माण झाल्याने आडवाणी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सोबत भारतीय जनता पार्टी म्हणजेच आजचा भाजप या पक्षाची स्थापना केली.

‘कांदा निर्यात बंदी जानेवारीमध्येच मागे अथवा..,’; खासदार विखे यांचे मोठे विधान

त्यानंतर 1984 ला इंदिरा गांधी यांची हत्या झाली. तर दरम्यान लोकसभा निवडणुका देखील लागल्या. मात्र यामध्ये इंदिरा गांधींच्या हत्येमुळे काँग्रेसबद्दल सहानुभूतीची लाट पसरली आणि काँग्रेसने एकतर्फी विजय मिळवला. तर भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांनी आपलं अध्यक्ष पद सोडलं आणि अडवाणी पक्षाचे अध्यक्ष झाले. आडवाणी हे कट्टर हिंदुत्ववादी होते. त्याचाच परिणाम पक्षाच्या विचारसरणीवर दिसायला लागला आणि याच दरम्यान विश्व हिंदू परिषदेने बाबरी मशिदीच्या जागेवर राम मंदिर निर्माण करण्यासाठी आंदोलन सुरू केलं. भाजपच्या जाहीरनाम्यामध्येही राम मंदिर निर्माणची घोषणा करण्यात आली.

या आंदोलनाला मूर्त स्वरूप देण्यासाठी अडवाणी यांनी 1990 मध्ये गुजरातमधील सोमनाथ या शहरातून रथयात्रा काढली. सोमनाथ हे असे शहर होतं. ज्या ठिकाणी हिंदू मंदिरांना मुस्लिम आक्रमणांनी उध्वस्त केलं होतं. याच यात्रेदरम्यान अडवाणींची अनेक आक्रमक भाषण गाजली. ज्यामध्ये ते म्हणाले होते की सौगंध राम की खाते है मंदिर वही बनायेंगे. याच घोषणा आजही अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या तोंडून ऐकायला मिळतात. या यात्रेला गुजरातमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. गुजरातमध्ये या यात्रेच्या यशामध्ये नरेंद्र मोदी यांचे मोठं योगदान राहिलं. आजही त्यांचे यात्रेतील आडवाणींसोबतचे फोटो पाहायला मिळतात.

Devendra Fadanvis : तुम्ही म्हणाल ‘है तैयार हम’ पण लोक तयार नाहीत; राहुल गांधींच्या भाषणावर फडणवीसांचं उत्तर

मात्र या यात्रेदरम्यान हिंदू मुस्लिम वाद चिघळला अनेक ठिकाणी दंगली झाल्याने ही यात्रा 30 ऑक्टोबर 1990 ला आयोध्येत पोहोचणार होती त्या अगोदरच 22 ऑक्टोबरला यात्रा बिहारमध्ये असताना मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी अडवाणी यांना नजरकैद केलं. तरी देखील 30 ऑक्टोबरला देशभरातील असंख्य कारसेवक आयोध्येत पोहोचले. यावेळी त्यांच्यावर पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. ही यात्रा रोखण्यात आली.

‘बेरोजगारीमुळे तरुणांची ताकद सोशल मीडियावर वाया’; गांधींची ‘अग्निवीर’चा दाखल देत सडकून टीका

त्यानंतर दोन वर्षांनी 1992 मध्ये विश्व हिंदू परिषदेने बाबरी मशिदीच्या शेजारी राम मंदिर निर्माण करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर पंतप्रधान नरसिंहराव आणि अडवाणी यांनी या आंदोलनातून कोणताही भारत वाद चिघळणार नसल्याचं आश्वासन दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कार सेवकांना सहा डिसेंबरला आयोध्यामध्ये एकत्र येत भजन करण्याची परवानगी दिली. यावेळी स्वतः लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल, भाजप नेत्या विजयाराजे सिंधिया, उमा भारती आणि बजरंग दल या संघटनेचे काही नेते या ठिकाणी उपस्थित होते. या सर्वांनी विरोध करून देखील कार सेवकांनी मशिदीच्या घुमटावर चढून मशीद पाडण्याचा प्रयत्न केला गेला.

इंडिया आघाडीत भाजपकडून फूट पाडण्याचा प्रयत्न, खरगेंचं मराठीत खणखणीत भाषण

काही वेळातच ही बातमी देशभर पोहोचली. त्यामुळे धार्मिक दंगली उसळल्या. परिणामी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी मुख्यमंत्री पदाचा, आडवाणी यांनी लोकसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. तसेच राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमधील भाजपची सरकारं बरखास्त करण्यात आली. आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेवर बंदी घालण्यात आली. या प्रकरणी अडवाणी आणि त्यांच्यासह इतर काही नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तब्बल तीस वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर 2020 मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने अडवाणी यांच्यासह सर्वांना निर्दोष ठरवलं.

‘कित्येक वर्ष तिरंग्याला वंदन केलं नव्हतं’; राहुल गांधींनी भाजप अन् RSS चं देशप्रेमच सांगितलं

अडवाणीयांच्या बद्दल सांगायचं झालं तर आडवाणी यांचा जन्म 1927 मध्ये सिंध प्रांतातील कराची या ठिकाणी झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर याच प्रांतातील हैदराबाद शहरातील एका शासकीय महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. वयाच्या 14 व्या वर्षीच अडवाणी संघाचे स्वयंसेवक झाले होते. ते नियमित संघाच्या शाखेला जायचे त्यानंतर त्यांना कराची शाखेचे प्रचार करण्यात आले होते मात्र 1947 ला देशाची फाळणी झाल्यानंतर अडवाणी यांचा परिवार मुंबईत स्थायिक झाला त्यानंतर त्यांनी मुंबई युनिव्हर्सिटीच्या लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतलं आणि 1951 ते जनसंघाचे सदस्य झाले आणि दिल्लीत स्थायिक झाले. आज याच लालकृष्ण अडवाणींच्या रथ यात्रेचं फलित म्हणून राम मंदीराचं निर्माण झालं असून येत्या 22 जानेवारीला मंदीराचं लोकार्पण होणार आहे. मात्र या 2014 नंतरच्या मोदी आणि शाह यांच्या भाजपमध्ये पडद्याच्या मागच्या कलाकरांप्रमाणे अडवाणी मागेच राहिले आहेत.

follow us