मोठी बातमी! देणगी अपहारप्रकरणी महासचिव चंपत राय यांचा राजीनामा मंजूर; राम मंदिर ट्रस्टच्या बैठकीत निर्णय

Ram Mandir Trust चे सरचिटणीस चंपत राय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता झालेल्या ट्रस्टच्या बैठकीमध्ये तो स्विकारण्यात आला आहे.

Ram Mandir Trust

Ram Mandir Trust

Ram Mandir Trust General Secretary Champat Rai’s resignation accepted in donation misappropriation case : अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित एक मोठी घडामोड समोर आली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता झालेल्या ट्रस्टच्या बैठकीमध्ये त्यांचा हा राजीनामा स्विकारण्यात आला आहे. अशी माहिती सुत्त्यारांनी दिली आहे. नंतर आता या पदावर बजरंग लाल बागडा यांच्या नावाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘मोआना’ स्टार कॅथरीन लगाआयाचा प्रेरणादायी प्रवास; “मला अनेक संधी स्वीकारण्याची भीती वाटत होती”

या प्रकरणाची सुरूवात श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य श्रीकृष्ण मोहन यांनी केलेल्या तक्रारींपासून झाली. मंदिरातील देणग्या, अर्पण आणि इतर आर्थिक व्यवहारांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी पोलिसांकडे औपचारीक तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तापास सुरू केला.

स्टार प्लसच्या ये फितूर तेरा चा नवा प्रोमो; मुलींच्या को-एज्युकेशनल भावनिक प्रवासाची कहाणी!

तपासादरम्यान अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, मनीष कुमार यादव, करुणेश पांडे, रामशंकर मिश्रा, सुभाष श्रीवास्तव आणि रामशंकर यादव उर्फ टिन्नू या आठ जणांची नावे समोर आली. त्यानंतर पोलिसांनी या सर्व आरोपींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तपासातून आणखी काही आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्ती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version