राम मंदीर देणगी अपहारप्रकरणी चंपत राय यांचा राजीनामा मंजूर; कृष्ण मोहन नवे महासचिव
Ram Mandir Trust चे सरचिटणीस चंपत राय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता झालेल्या ट्रस्टच्या बैठकीमध्ये तो स्विकारण्यात आला आहे.
Ram Mandir Trust General Secretary Champat Rai’s resignation accepted : अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित एक मोठी घडामोड समोर आली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता झालेल्या ट्रस्टच्या बैठकीमध्ये राय आणि मिश्रा यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून, एफआयआर दाखल करणारे कृष्ण मोहन यांनी ट्रस्टचा कार्यभार स्वीकारला आहे.
Ram Mandir donation embezzlement case: The resignations of Champat Rai (General Secretary) and Anil Mishra (Trustee) have been accepted, says Swami Govind Dev Giri Ji Maharaj, Treasurer of the Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust pic.twitter.com/La4OINowQ8
— ANI (@ANI) July 6, 2026
‘मोआना’ स्टार कॅथरीन लगाआयाचा प्रेरणादायी प्रवास; “मला अनेक संधी स्वीकारण्याची भीती वाटत होती”
माजी आयएफएस अधिकारी कृष्ण मोहन राम मंदिर ट्रस्टचे कामकाज पाहणार असून ट्रस्टच्या बैठकीत त्यांची महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. “दोषी आढळलेल्यांना योग्य शिक्षा मिळावी, हा आमचा प्रयत्न आहे. कोणतीही त्रुटी दूर करणे हा माझा पहिला प्रयत्न असेल. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी मी प्रयत्नशील राहीन. ट्रस्टची प्रतिमा डागाळली आहे आणि समाजात अविश्वास निर्माण झाला आहे. आम्ही लोकांच्या मनात तो पुन्हा स्थापित करू अशी प्रतिक्रिया कृष्ण मोहन यांनी पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दिली आहे.
स्टार प्लसच्या ये फितूर तेरा चा नवा प्रोमो; मुलींच्या को-एज्युकेशनल भावनिक प्रवासाची कहाणी!
राजीनाम्यावर एकमताने निर्णय
राम मंदिर ट्रस्टच्या बैठकीत चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचा राजीनामा देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. मिश्रा आणि राय यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर आता त्यांच्यावर काय कारवाई केली जाईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या संपूर्ण अपहार प्रकरणी एसआयटी तपास करत आहे.
ट्रस्टच्या बैठकीत कोण कोण उपस्थित होते?
आज पार पडलेल्या ट्रस्टच्या बैठकीला ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास, खजिनदार स्वामी गोविंद देव गिरी महाराज, निर्मोही आखाड्याचे प्रतिनिधी आणि विश्वस्त महंत दिनेंद्र दास, ट्रस्ट सदस्य कामेश्वर चौपाल उपस्थित होते. तसेच, उत्तर प्रदेश सरकारच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव (पदसिद्ध सदस्य) संजय प्रसाद आणि अयोध्येचे जिल्हाधिकारी हेही उपस्थित होते.
नेमकं प्रकरण काय?
या प्रकरणाची सुरूवात श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य श्रीकृष्ण मोहन यांनी केलेल्या तक्रारींपासून झाली. मंदिरातील देणग्या, अर्पण आणि इतर आर्थिक व्यवहारांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी पोलिसांकडे औपचारीक तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तापास सुरू केला.
तपासादरम्यान अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, मनीष कुमार यादव, करुणेश पांडे, रामशंकर मिश्रा, सुभाष श्रीवास्तव आणि रामशंकर यादव उर्फ टिन्नू या आठ जणांची नावे समोर आली. त्यानंतर पोलिसांनी या सर्व आरोपींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तपासातून आणखी काही आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्ती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.