Ram Mandir Trust कडून आधी नकार आता निमंत्रण; जोशी-अडवाणी लावणार प्राणप्रतिष्ठेला हजेरी

Ram Mandir Trust : राम मंदिर ट्रस्टकडून (Ram Mandir Trust ) पुढील महिन्यात होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. अयोध्येत राम मंदिर अस्तित्वात यावे यासाठी ज्या नेत्यांनी मोठा संघर्ष केला त्यात या दोघांचं नाव घ्यावंच लागेल. मात्र अगोदर या दोघांना […]

Ram Mandir Trust कडून आधी नकार आता निमंत्रण; जोशी-अडवाणी लावणार प्राणप्रतिष्ठेला हजेरी

Ram Mandir Trust

Ram Mandir Trust : राम मंदिर ट्रस्टकडून (Ram Mandir Trust ) पुढील महिन्यात होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. अयोध्येत राम मंदिर अस्तित्वात यावे यासाठी ज्या नेत्यांनी मोठा संघर्ष केला त्यात या दोघांचं नाव घ्यावंच लागेल. मात्र अगोदर या दोघांना या सोहळ्यासाठी न येण्याची विनंती ट्रस्टकडून करण्यात आली आहे.

IPL Auction : पॉवेल-हेड मालामाल! दोघांसाठी फ्रँचायझींनी केला पैशांचा वर्षाव

याबाबत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी सांगितलं की, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या दोघांना पुढील महिन्यात होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. यावेळी त्यांच्याशी आम्ही राम मंदिरासाठी केलेल्या आंदोलनाविषयी चर्चा केली. या दोनही नेत्यांनी सोहळ्याला येण्याचा पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आहे.

…म्हणून केली होती सोहळ्याला न येण्याची विनंती

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आरोग्य आणि वयामुळे या सोहळ्यासाठी येऊ नये अशी विनंती त्यांना राम मंदिर ट्रस्टकडून करण्यात आली होती. विशेष म्हणजे, या दोन्ही नेत्यांनी ट्रस्टची ही विनंती स्वीकारली होती. ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत याबाबत माहिती दिली होती. पत्रकारांनी त्यांना अडवाणी आणि जोशी यांना का बोलावलं नाही, असा प्रश्न विचारला. त्यावर चंपत राय म्हणाले, दोघेही आता वयोवृद्ध झाले आहेत.

Malaika Arora: ‘फोटो काढायला आला अन् थेट मलायकाच्या कंबरेवर…; व्हिडीओ व्हायरल

त्यांचं वय पाहता त्यांना आम्ही या कार्यक्रमासाठी येऊ नका अशी विनंती केली. त्यांनी ही विनंती मान्य केली. अयोध्येत राम मंदिर व्हावं यासाठी लालकृष्ण अडवाणी यांनी 90 च्या दशकात रथयात्रा काढली होती. त्यांच्या या आंदोलनाचा फायदाही झाला होता. तसेच राम मंदिराच्या आंदोलनात दुसरे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचंही मोठं योगदान राहिलं आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी शक्यता होती. मात्र, आता ते या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत हे आता स्पष्ट झालं होतं. मात्र त्यानंतर आता त्यांना पुन्हा निमंत्रण देण्यात आलं आहे.

जवळपास चार हजार साधू पुजारी आणि 2200 अन्य मान्यवर व्यक्तींना या सोहळ्याला निमंत्रित करण्यात आलं आहे. देशातील प्रमुख मंदिरांच्या मुख्य पुजाऱ्यांना देखील निमंत्रित केलं आहे. प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानंतर 24 जानेवारी रोजी मंडलपूजा करण्यात येईल. तसेच 23 जानेवारीपासून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे, अशी माहिती चंपत राय यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Exit mobile version