Jharkhand Politics : झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन (Cahmpai Soren) दिल्लीवरून थेट राजधानी रांचीत दाखल झाले आहेत. यानंतर संशयाचं वातावरण आता संपलं आह. चंपाई सोरेन यांची पुढील रणनिती काय असेल याची चर्चा आता सुरू झाली आहे. येथे आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. येत्या शुक्रवारी भाजपात प्रवेश (Jharkhand Politics) घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रांची येथील घरी आल्यानंतर त्यांनी सर्वात आधी राजीनामा पाठवून दिला. मिळालेल्या माहितीनुसार चंपाई सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चाचे सदस्यत्व आणि राज्य कॅबिनेटमधून राजीनामा दिला आहे. गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीला चंपाई सोरेन मात्र हजर राहणार नाहीत. यानंतर त्यांनी थेट पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत पुढील राजकारणाचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
Champai Soren : झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा राजीनामा, हेमंत सोरेनकडे पुन्हा राज्याची धुरा
झारखंड मुक्ती मोर्चाचे महासचिव विनोद पांडे यांनी सोरेन यांना त्यांच्या निर्णयावर पुन्हा विचार करण्याची विनंती केली होती. आता त्यांनी ही विनंती राजकारणाचा एक भाग म्हणून केली होती. यातून लोकांमध्ये असा संदेश देण्याचा प्रयत्न होता की झामुमोने चंपाई सोरेन यांनी थांबवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. नोवामुंडीमध्ये सारंडा येथील झामुमो नेते दखळ हेम्ब्रम आणि झुनू सुरीन यांनी बुधवारी बडाजामदा येथे आयोजित सभेत भाजपाचा झेंडा हाती घेतला. माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या उपस्थितीत या दोन्ही नेत्यांचे भाजपात स्वागत करण्यात आले.
राजकीय जाणकारांच्या मते चंपई सोरेन जर भाजपात आले तर आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात आदिवासी समजाच्या मतांमध्ये फूट होऊ शकते. झारखंड मुक्ती मोर्चाला मिळणारी आदिवासी समाजाची मते काही प्रमाणात भाजपला मिळू शकतात. परंतु, यामुळे पक्षात गटबाजी वाढण्याचाही धोका आहे. चंपई सोरेन यांचा जमशेदपूरसह कोल्हान भागात मोठा दबदबा आहे. विशेष करून पोटका, घाटशिला, बहरागोडा, ईचागढ, सरायकेला-खरसावां आणि पश्चिम सिंहभूम जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघात त्यांच्या पाठीशी मोठा जनाधार आहे.
भाजपने माजी मुख्यमंत्रीच फोडला, पक्षप्रवेशाची तारीखही ठरली; ‘या’ दिवशी होणार प्रवेश
2019 मधील लोकसभा निवडणुकीत चंपई सोरेन यांनी जमशेदपूर मतदारसंघातून निवडणूक लढली होती. या आदिवासी बहूल भागात संथाल आणि भूमिज समाजाने झारखंड मुक्ती मोर्चाला समर्थन दिले होते. कोल्हान विधानसभा मतदारसंघात तर जय पराजयाचं अंतर फक्त दहा ते वीस हजार मतांच्या दरम्यानच असतं अशा परिस्थितीत चंपाई सोरेन खरंच भाजपात आले तर त्यांचा पक्षाला फायदाच होणार आहे.