Akanksha Singh UPSC Result : नुकतंच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नागरी सेवा परीक्षा 2025 परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय. यंदा या परिक्षेत सर्वसामान्य घरातील अनेकांनी बाजी मारलीय. अशीच एक बिहारच्या भोजपूरची आकांक्षा सिंग. आरा जिल्ह्यातील पवना पोलीस स्टेशन परिसरातील खोपीरा गावची रहिवासी आणि रणवीर सेनेचे माजी प्रमुख ब्रह्मेश्वर मुखिया यांची नात आकांक्षा सिंगने या परिक्षेत 301 वा क्रमांक मिळवून कुटुंबाला सन्मान मिळवून दिलाय.
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) 6 मार्च रोजी नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला अन् संपूर्ण देशात आकांक्षाचे (Akanksha Singh) यश चर्चेचा विषय बनले. महत्त्वाचे म्हणजे, 2012 मध्ये हत्या झालेल्या आजोबा ब्रह्मेश्वर मुखिया यांची प्रेरणा घेत आकांक्षाने या परीक्षेत यश मिळवलेय.
या यशानंतर, आकांक्षा म्हणाली की, ती लहानपणापासूनच तिच्या आजोबांबद्दल प्रश्न विचारत होती.जेव्हापासून मला कळायला लागले तेव्हापासून मी कुटुंबाला विचारत होती की आजोबा कुठे आहेत, परंतु कधीही कुटुंबाकडून सरळ उत्तर मिळाले नाही. पण ती मोठी झाल्यावर तिला कळले की, तिचे आजोबा बराच काळ तुरुंगात होते आणि समाजासाठी लढत होते.
आकांक्षा म्हणाली की, तिच्या आजोबांच्या संघर्षाने तिचे कुटुंब 10-20 वर्षे मागे टाकले, परंतु तो संघर्ष तिच्यासाठी प्रेरणास्रोत बनला. ती म्हणाली की, आजही तिला तिच्या आजोबांच्या आठवणीतून पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. आकांक्षा सिंगने तिच्या यशाचे श्रेय तिच्या पालकांना, कुटुंबातील सदस्यांना आणि शिक्षकांना दिले.
तसेच यावेळी ती म्हणाली की, यूपीएससी सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ती दररोज 10 ते 12 तास अभ्यास करते. तिच्या मते, या परीक्षेत यश केवळ अभ्यासाने मिळत नाही. सातत्य, संयम आणि आत्मविश्वासही तितकाच महत्त्वाचा आहे. तिने यावर भर दिला की अपयशाची भीती बाळगण्याऐवजी, त्यातून शिकून पुढे जावे.
यावेळी ती म्हणाली की, ती तिच्या पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरली, परंतु तिने हार मानली नाही आणि चांगली तयारी करण्यासाठी तिच्या कमकुवतपणावर काम केले. परिणामी, तिला दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाले.
ब्रह्मेश्वर मुखिया कोण होते?
आकांक्षा सिंह यांचे आजोबा ब्रह्मेश्वर मुखिया हे बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील खोपीरा गावचे रहिवासी होते आणि त्यांना रणवीर सेनेचे संस्थापक म्हणून ओळखले जाते. 1994 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली रणवीर सेना स्थापन झाली, जेव्हा 1990 च्या दशकात बिहारमधील नक्षलवादी संघटना आणि मोठ्या शेतकऱ्यांमधील संघर्ष सुरू होता. त्यावेळी बिहारच्या जातीय राजकारणात ही खाजगी सेना महत्त्वाची मानली जात होती आणि नक्षलवादी संघटनांशी अनेक चकमकी घडल्या.
Video : आई पुढच्या जन्मी प्रेम दे…, रडत रडत Insta Live अन् अनुराग डोभालचा स्वतः संपवण्याचा प्रयत्न-
या संघर्षांमुळे ब्रह्मेश्वर मुखिया यांना दीर्घकाळ तुरुंगवास भोगावा लागला. 2011 मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर 2012 मध्ये त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आता त्यांची नात आकांक्षा सिंह हिने यूपीएससी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करून स्वतःसाठी एक नवीन स्थान निर्माण केले आहे.
