Download App

RBI चा राम मंदिर बांधणाऱ्या कंपनीला दणका, अडीच कोटी रुपयांचा ठोठावला दंड

  • Written By: Last Updated:

RBI Penalty on L&T Company: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) म्हणजेच आरबीआय बँकांवर सातत्याने कडक कारवाई करत आहे. बँक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय आणि कोटक बँकेनंतर आता पुन्हा एकदा आरबीआयने मोठी कारवाई केली आहे. RBI ने L&T फायनान्स लिमिटेडवर (L&T Finance Limited) मोठी कारवाई केली आहे. नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांशी संबंधित काही नियमांचे पालन न केल्याबद्दल RBI ने L&T Finance Ltd ला 2.5 कोटी रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे.

Contract Basis Recruitment : …पण कंत्राटी भरतीची मुळं कुठे रूजलीये? जाणून घ्या… 

याप्रकरणी आरबीआयने म्हटले आहे की, L&T फायनान्स लिमिटेड कंपनीनं कर्ज देतांना ग्राहकांच्या ई-केवायसी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्यानं कंपनीला अडीच कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला. कंपनीवर कारवाई करण्यापूर्वी अतिशय सखोल चौकशी करण्यात आली होती. परंतु अहवाल समोर आल्यानंतर, NBFC ने त्यांच्या किरकोळ कर्जदारांना दिलेल्या कर्ज अर्ज/मंजुरी पत्रांमध्ये कर्जदारांच्या विविध श्रेणींकडून वेगवेगळे व्याजदर आकारण्याचे जोखीम वर्गीकरण आणि जस्टिफिकेशना खुलासा केला नाही.

उल्लेखनीय बा म्हणजे, RBI ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की NBFC ने कर्ज मंजूरीच्या वेळी निर्धारित केलेल्या दंडात्मक व्याजदरापेक्षा जास्त व्याजदर त्यांच्या कर्जदारांकडून आकारले आहे. तसेच व्याजदरातील बदलाबाबत कोणतीही माहिती ग्राहकांना देण्यात आली नाही. त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

तसेच या प्रकरणी कंपनीला नोटीसही देण्यात आल्याचे आरबीआयने निवेदनात म्हटले आहे. नोटीसला उत्तर देताना, एल अँड टी फायनान्स लिमिटेड आपली भूमिका योग्यरित्या मांडू शकले नाही. तसेच त्याच्यावरील सर्व आरोप खरे ठरले. अशा परिस्थितीत RBI ने L&T Finance Limited वर आर्थिक दंड आकारण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, L&T Finance Limited ही कंपनी अयोध्येत राम मंदिर बांधत आहे, जे 1000 वर्षांपर्यंत कोणत्याही वादळ, भूकंप किंवा पुरामुळे हादरणार नाही. विशेष म्हणजे, कंपनीने गुजरातमधील जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीसारख्या प्रकल्पांवरही काम केले आहे. आज ही कंपनी जगातील टॉप-5 बांधकाम कंपन्यांमध्ये गणली जाते.

कंपनी या क्षेत्रातही काम करते

L&T Finance Limited ही 80 वर्षे जुनी भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे. त्याचे मुख्यालय मुंबईत आहे. ही कंपनी सध्या जगभरातील 30 हून अधिक बांधकाम करत आहे. एल अँड टी फायनान्स लिमिटेड माहिती तंत्रज्ञान, तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवा या क्षेत्रांमध्ये देखील कार्यरत आहे.

Tags

follow us