Download App

RBI Action on Bank : रिझर्व्ह बॅंकेकडून देशातील पाच बँकांना दणका

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) पाच बँकांवर बंदी घातल्याची माहिती समोर आलीय. ढासळत्या आर्थिक स्थितीमुळं आरबीआयनं देशातील पाच सहकारी बँकांवर (Co-operative Banks) बंदी घातलीय. त्यामुळं या बँकांच्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागणारंय. या बॅंकेच्या ग्राहकांना खात्यातून (Bank Account) पैसे काढता येणार नाहीत. आरबीआयनं घातलेल्या बंदीमुळं या बँकांच्या खात्यातून पैसे काढणं पूर्णपणे बंद करण्यात आलंय.

देशातील बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरबीआयनं काही सहकारी बँकावर निर्बंध लादलेत. बँकांवरील ही बंदी सहा महिने कायम राहणार असल्याचं सांगितलं जात असून याबाबत लवकरच निर्णय होईल. त्यामुळं या बँकांचे व्यवहार बंद असणार आहेत.

आज कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान

या पाच बँकेचे ग्राहक स्वत:च्या खात्यात जमा केलेले पैसे काढू शकणार नाहीत. या बँका आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणालाही नवीन कर्ज देऊ शकणार नाहीत किंवा कर्ज घेऊ शकणार नाहीत. याशिवाय, कोणतीही मालमत्ता हस्तांतरित करू शकणार नाही. आरबीआयनं बंदी घातलेल्या पाच पैकी तीन बँकांवर अंशत: ठेवी काढण्याची बंदी आणि इतर दोन बँकांवर पूर्ण बंदी घातलीय.

रिझर्व्ह बँकेनं बंदी घातलेल्या पाच सहकारी बँकांमध्ये अकलूज-महाराष्ट्र (Shankarrao Mohite Patil Sahakari Bank), एचसीबीएल सहकारी बँक, लखनौ (HCBL Co-operative Bank), आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद (Adarsh Mahila Nagari Sahakari Bank Maryadit), शिमशा. सहकारी बँक नियामठा मद्दूर-कर्नाटक (Shimsha Sahakara Bank Niyamitha), उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा-आंध्र प्रदेश (Uravakonda Co-operative Town Bank Ltd) आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, या बँकांचा समावेश आहे.

Tags

follow us