Download App

RBI ची मोठी कारवाई, HDFC बँकेला ठोठावला लाखोंचा दंड; ग्राहकांवर होणार परिणाम?

RBI On HDFC Bank :  देशाची सर्वात मोठी बँक आरबीआय (RBI) देशात व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांच्या कामकाजावर लक्ष ठेवून असते. जर व्यवहार

  • Written By: Last Updated:

RBI On HDFC Bank :  देशाची सर्वात मोठी बँक आरबीआय (RBI) देशात व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांच्या कामकाजावर लक्ष ठेवून असते. जर व्यवहार करताना कोणत्याही बँकेने नियमांकडे दुर्लक्ष केले तर आरबीआय या बँकेवर दंड आकारतो किंवा कधी कधी परवाना देखील रद्द करतो. नुकतंच आरबीआयने दोन बँकांना दंड ठोठावला आहे.

याबाबत आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार,  एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि पंजाब अँड सिंध बँकेला (Punjab and Sindh Bank) नियमांचे पालन न केल्याबद्दल दंड ठोठावला आहे. केवायसीबाबत (KYC) आरबीआयच्या नियमांचा पालन न केल्याने आरबीआयने एचडीएफसी बँकेला तब्बल 75 लाखांचा दंड ठोठवला आहे तर बँकांनी दिलेल्या मोठ्या कर्जाची माहिती साठवणं, सर्वसामान्यांना बँकिंग सेवा पुरविणे आणि त्यांच्यासाठी बेसिक सेव्हिंग्ज बँक खाती (BSBDA) बाबत लागू असणाऱ्या  निर्देशांचे पालन न केल्याने पंजाब अँड सिंध बँकेला 68.20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. तर याच बरोबर केएलएम एक्झिवा फिनवेस्टलाही (KLM Exiva Finvest) 10 लाख रुपयांचा दंड आरबीआयने ठोठावला आहे.

‘बटेंगे तो कटेंगे’ चा नारा देणारे आता ‘सौगात’ वाटणार, ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

तर दुसरीकडे या बँकांमध्ये खाते असणाऱ्या ग्राहकांना आरबीआयने मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयने म्हटले आहे की हा दंड नियामक त्रुटींवर आधारित असल्याने या दंडाचा कोणताही परिणाम ग्राहकांच्या व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर होणार नाही.

रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे 99’ मध्ये झळकणार ‘हे’ चेहरे

follow us