RBI reduced Repo Rate : रिजर्व बँकेच्या पतधोरण समितीने देशातील कोट्यावधी लोकांना मोठा दिलासा दिला आहे. कर्जाच्या हप्त्यात दिलासा मिळाला आहे. आरबीआयने सलग दुसऱ्यांदा रेपो दरात 0.25 टक्क्यांची (Repo Rate) कपात केली आहे. रिजर्व बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या या घोषणेनंतर रेपो रेट आणखी कमी होऊन 6 टक्क्यांवर आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयाने जगात खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे जागतिक मंदी आणि महागाई वाढीचे सावट आहे, अशा आव्हानात्मक परिस्थितीत रिजर्व बँकेने कर्जदारांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
जागतिक अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची शक्यता दिसत असताना रिजर्व बँकेचा हा निर्णय चांगला मानला जात आहे. बँकेच्या पतधोरण समितीतील सदस्यांनी बहुमताने रेपोदरात पाव टक्का कपातीची शिफारस केली होती. यानंतर हा निर्णय घेण्यात आला. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सलग दुसऱ्यांदा रेपो दरात कपात केली आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात रेपोदरात पावटक्का कपात करण्यात आली होती. ही कपात तब्बल 5 वर्षांनंतर झाली होती. या कपातीनंतर सर्वसामान्य कर्जदारांना आणखी दिलासा मिळणार आहे. होम लोन, कार लोनसह बँकिंग क्षेत्रातील रिटेल लोनच्या कॉस्टमध्ये घट होईल. याचा फायदा रियल इस्टेट क्षेत्राला होणार आहे.
Monetary Policy Statement by Shri Sanjay Malhotra, RBI Governor- April 09, 2025, 10 am https://t.co/0OCWkvfgc3
— ReserveBankOfIndia (@RBI) April 9, 2025
मोठी बातमी! कर्जदारांचा EMI वाढणार नाही; आरबीआयकडून रेपो रेट पुन्हा जैसे थे
मार्च महिन्यातील महागाईचे आकडे अजून समोर आलेले नाहीत. परंतु, फेब्रुवारी महिन्यात महागाई दर 4 टक्क्यांच्या खाली आला होता. या आकडेवारीचा विचार केला तर देशात किरकोळ महागाई दर 3.6 टक्क्यांवर आहे. सात महिन्यांतील हा सर्वात निचांकी दर आहे. खाद्य पदार्थांच्या महागाईत घट झाल्याने महागाईत कमी झाल्याचे मानले जात आहे. आता एप्रिल महिन्यातही महागाई चार टक्क्यांपेक्षा कमी राहील असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यामागे कारणही आहे. हवामान विभागाने यंदा जास्त उष्णता राहील असा इशारा दिला आहे. याचा परिणाम पिकांवर होणार आहे. यामुळे भाजीपाला आणि धान्याच्या किंमती वाढलेल्याच राहतील. याचा परिणाम खाद्य महागाईवर पडेल.
आरबीआयने व्यक्त केलेला अंदाज पाहता चालू आर्थिक वर्षात महागाई 4.8 टक्के राहील. चौथ्या तिमाहीत महागाईत 10 बेसिस पॉइंटची वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये महागाई 4.2 टक्के राहील असा अंदाज आहे. पहिल्या तिमाहीत महागाई 4.6 टक्के राहू शकते. याआधी महागाई 4.5 टक्के राहील असे सांगितले जात होते. दुसऱ्या तिमाहीत चार टक्के, तिसऱ्या तिमाहीत 3.8 टक्के तर चौथ्या तिमाहीत महागाई 4.2 टक्के राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
‘या’ बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा! 25000 रूपयांपर्यंतची रक्कम काढण्यास आरबीआयची परवानगी