Download App

Loksabha 2024 : काँग्रेससोबत जायला तयार पण राहुल गांधी चेहरा नको; BRSची भूमिका

  • Written By: Last Updated:

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या एकीसाठी अनेक बैठका होत आहेत. पण या बैठकांना तेलंगणातील भारत राष्ट्र समिती (BRS) या बैठकांना गैरहजर असते. BRS ने 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बिगर-भाजप आणि बिगर-काँग्रेस “आघाडी”साठी प्रयत्न केले होते. पण आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत सहभागी होण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

पण विरोधी आघाडीचा चेहरा म्हणून राहुल गांधी यांच्यावर भारत राष्ट्र समितीचा आक्षेप आहे. इंडियन एक्स्प्रेसने आज त्या संदर्भातील बातमी दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा असतानाही के चंद्रशेखर राव आणि त्यांचा पक्ष अधिक “समावेशक भूमिका” स्वीकारण्यास तयार आहे. या वृत्तानुसार, भाजप आणि केंद्र सरकारने प्रादेशिक पक्षांवर मोठा दबाव आणला आहे, त्यामुळे बीआरएस आपली भूमिका बदलण्याचा विचार करत आहे.

सत्तासंघर्षाच्या निकालानंतर अजित पवार मुख्यमंत्री?

मीडिया रिपोर्टनुसार राव यांच्या मते सत्ताधारी पक्षाकडून विरोधी नेत्यांचा आवाज शांत करण्यासाठी ज्या प्रकारे केंद्रीय एजन्सींचा वापर केला जात आहे. त्यामुळे  आपण लवकरच पाकिस्तान बनू. पाकिस्तानमध्ये इम्रान खान सत्तेत असताना विरोधी पक्षाच्या नेत्यांना देश सोडून पळून जावे लागले होते. आता खान सत्तेतून गेल्यावर जीवाची बाजी लावत आहेत. अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे सर्वांनी एकत्र यायला हवे. देश वाचवण्यासाठी मतभेद संपवून भाजपला पराभूत करण्याला प्राधान्य द्यायला आहे.

केसीआर यांची मुलगी आणि माजी खासदार के कविता दिल्ली दारू धोरण प्रकरणी ईडी चौकशीला सामोरे जात आहेत. पक्षाचे नाव बदलून बीआरएस केले आहे तेव्हापासून ते विविध राज्यांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. पण त्याच वेळी ते तेलंगणामध्ये काँग्रेसलाच टक्कर देत आहेत. केसीआर यांच्या जवळच्या एका नेत्यांनी एक वाहिनीशी बोलताना सांगितलं होत की आमचे एवढेच म्हणणे आहे की, जिथे काँग्रेस मजबूत आहे, तिथे तसा वाटा काँग्रेसला मिळाला पाहिजे. पण जिथे इतर प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत तिथे काँग्रेसने जागा सोडल्या पाहिजेत. विरोधी आघाडीसाठी काम करण्याचा आणि विरोधी पक्षांची ताकद वाढवण्याचा हा एकमेव मार्ग आहे.”

कर्नाटक BJP कडून तब्बल दीड लाख कोटी रुपयांची लूट, प्रियंका गांधींनी केले आरोप

Tags

follow us