Download App

गेहलोत-पायलट वादात काँग्रेस पक्षश्रेष्ठींची यशस्वी मध्यस्थी; राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये मोठा निर्णय

राजस्थान काँग्रेसमध्ये (Congress) गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला गेहलोत-पायलट वादावर अखेर पडदा पडला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) या 2 नेत्यांमधील वादात काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी यशस्वी मध्यस्थी केली असून पुढील निवडणुका एकजुटीने लढविण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती आहे.

वसुंधरा राजे सरकारच्या काळात झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यास अशोक गेहलोत टाळाटाळ करत असल्याचा आरोप सचिन पायलट करत होते. दुसरीकडे अशोक गेहलोतही पायलट यांच्यावर टीका करताना दिसून आले होते. Reconciliation between Ashok Gehlot and Sachin Pilot in Rajasthan, decision to contest elections together :

 

आज अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांनी गेहलोत आणि पायलट यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. यावेळी पक्षाचे राजस्थान प्रभारी सुखजिंदर रंधावा, पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि राजस्थानचे नेते जितेंद्र सिंह हे देखील उपस्थित होते. राजस्थानचे मुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या उपस्थितीत समोरासमोर बसण्याची प्रदीर्घ काळानंतर ही पहिलीच वेळ होती.

पावसाच्या तोंडावर राज्याच्या सातही विभागांमध्ये ‘एनडीआरएफ’ तैनात…

विधानसभा निवडणुकीपूर्वी राजस्थान कॉंग्रेसमधील वाद मिटवण्यासाठी आणि दोन्ही नेत्यांमधील मतभेद मिटवण्यासाठी पक्षाचे नेतृत्वही जोरदार प्रयत्न करत होते. दरम्यान, या भेटीनंतर केसी वेणुगोपाल यांनी रात्री उशीरा पत्रकारांना सांगितले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पक्षाचे नेते सचिन पायलट यांची भेट घेतली. यानंतर अशोक गेहलोत आणि सचिन पायलट हे दोघांनीही भाजपविरोधात एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला. नेत्यांमधील ही भेट तब्बल ४ तास चालली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी एकदिलाने निवडणूक लढवणार आणि त्यात विजयही नोंदवणार, असा निर्धार केला, असं वेणुगोपाल यांनी सांगितलं.

Tags

follow us