पावसाच्या तोंडावर राज्याच्या सातही विभागांमध्ये ‘एनडीआरएफ’ तैनात…

पावसाच्या तोंडावर राज्याच्या सातही विभागांमध्ये ‘एनडीआरएफ’ तैनात…

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. या बैठकीत विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी आपत्ती दल नेमून बचावकार्याची पथके तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यातील विविध भागांत एनडीआरएफच्या तुकड्या आपत्तीमध्ये वेळेत पोहचू शकत नाहीत, यासाठी राज्यात सातही विभागांच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दले नेमण्याची कार्यवाही व्हावी, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

IPL च्या या हंगामात गोलंदाजांनी टाकले 100 पेक्षा जास्त नो बॉल

तसेच सध्या एसडीआरएफच्या दोन तुकड्या धुळे आणि नागपूर येथे आहेत. याशिवाय राज्यात ही दले असतील. ठाणे येथे महानगरपालिकेने आपत्ती प्रतिसादासाठी वेळेत धाऊन जाणारे दल तयार केले असून त्यांनी विशेषत: इमारत दुर्घटनामध्ये उत्तम काम केले आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या ठिकाणी उंच इमारती आहेत तसेच आपत्तींची शक्यता जास्त आहे अशा ठिकाणी पालिकांनी आपली बचाव दले तयार करावीत, अशाही सूचना त्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान. राज्य आपत्ती धोके व्यवस्थापन निधीचा प्रभावीपणे खर्च करा तसेच कोकण आपत्ती सौम्यीकरण कामे त्वरित सुरु करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीत राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीचा खर्च, कोकण आपत्ती सौम्यीकरण कामे, कोविड व विविध प्रसंगी करण्यात आलेल्या बचाव कार्याचा खर्च, ई पंचनामे, आपदा मित्र, ई सचेत प्रणाली आदी मुद्द्यांवर मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी सादरीकरण केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube