Download App

अंबानींची मोठी डील! रिलायन्स मीडिया आणि वॉल्ट डिस्ने मर्ज, नीता अंबानी चेअरपर्सन

  • Written By: Last Updated:

Disney-Reliance Deal: गेल्या काही दिवसांपासून वॉल्ट डिस्ने (Walt Disney) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) यांच्यात करार होणार असल्याचे वृत्त होते. अखेर आज वॉल्ट डिस्ने आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी त्यांच्या मीडिया ऑपरेशन्सचे भारतात विलीनीकरण करण्यासाठी महत्वपूर्ण करार केला आहे. वॉल्ट डिस्ने आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मीडिया ऑपरेशन्सच्या जॉईंट व्हेचरची नुकतीच घोषणा करण्यात आली. या भागीदारीअंतर्गत दोन कंपन्या एकत्र आल्या असून नवीन संस्थेमध्ये 11,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

ज्यांना कोणी विचारलं नाही, त्यांना मी पूजलं; PM मोदींची काँग्रेसवर सडकून टीका

रिलायन्स आणि डिस्ने यांच्या जॉईंट व्हेंचरची किंमत 70,352 कोटी रुपये इतकी असेल. यामध्ये रिलायन्सची हिस्सेदारी 63.16 टक्के असेल. तर डिस्नेला 36.84 टक्के हिस्सा मिळेल. विशेष म्हणजे, नीता अंबानी या दोन्ही कंपन्यांच्या मीडिया ऑपरेशन्सद्वारे तयार केलेल्या संयुक्त कंपनीच्या अध्यक्षा असतील. सध्या नीता अंबानी रिलायन्स फाऊंडेशनची जबाबदारी सांभाळत आहेत. उदय शंकर हे या नव्या कंपनीचे उपाध्यक्ष असतील.

Sai Tamhankar : त्या खास गोष्टीच्या आठवणीने सई झाली भावूक, पोस्ट करत म्हणाली 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, या नव्या करारामुळे भारतीय मनोरंजन उद्योगात एका नव्या युगाची सुरुवात होईल, जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट माध्यम समूह म्हणून डिस्नेचा आम्ही नेहमीच आदर केला आहे.

अंबानी पुढे म्हणाले की आम्ही दोन्ही कंपन्यांच्या धोरणात्मक उपक्रमांची अंमलबजावणी करण्यास उत्सुक आहोत. या जॉईंट व्हेंचररचा उपयोग देशभरातील दर्शकांना परवडणाऱ्या दरात सेवा देण्यासाठी केला जाईल. म्हणूनच रिलायन्स समूहाचे प्रमुख भागीदार म्हणून आम्ही डिस्नेचे स्वागत करतो.

दरम्यान, वॉल्ट डिस्नेचे सीईओ बॉब इगर यांनी दोन कंपन्यांमधील करारानंतर सांगितले की, रिलायन्सला भारतीय बाजारपेठ आणि ग्राहकांची सखोल माहिती आहे. त्यामुळे या नवीन कंपनीला देशातील आघाडीच्या मीडिया कंपन्यांपैकी एक बनवण्यासाठी आम्ही एकत्र काम करू. त्या माध्यमातून ग्राहकांना डिजिटल सेवा आणि मनोरंजनासाठी एक सक्षम पर्याय उपलब्ध होईल.

follow us