Download App

Republic Day : संविधानाबद्दलच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Republic Day : आज 26 जानेवारीला आपण भारतीय नागरिक आपल्या देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day ) साजरा करत आहोत. आता प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे कारण याच दिवशी 1950 साली संपूर्ण देशात संविधान (Constitution ) लागू करण्यात आले होते. पण आपल्या याच संविधानाच्या अनेक खास गोष्टी आपल्यापैकी अनेकांना माहिती नसतात त्यामुळे कोणत्या आहेत या खास गोष्टी जाणून घेऊया सविस्तर…

Sanjay Leela Bhansali च्या ‘लव्ह अँड वॉर’ मध्ये दिसणार ‘हे’ ट्रॅंगल; रिलीज डेटही समोर

आपल्या संविधानाबद्दलची पहिली गोष्ट आहे. ती म्हणजे आपल्या देशाला एक संविधान असावं अशी कल्पना सगळ्यात पहिल्यांदा मांडली. ते 1934 मध्ये एन एम रॉय यांनी. तीच मागणी नंतर 1935 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसने केली. तसेच तुम्हाला माहितीये का? भारतीय राज्यघटनेला कर्जाची पिशवी असं का म्हटलं जातं? कारण आहे की, भारतीय राज्यघटनेमध्ये जगभरातील अनेक देशांच्या राज्यघटनेमधील तरतुदी घेण्यात आलेल्या आहेत. मात्र त्या घेताना भारतातील ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांनुसार त्या लागू करण्यात आलेल्या आहेत.

‘मराठा आरक्षणाबाबत सरकार आकडता हात घेणार नाही’; CM एकनाथ शिंदेंनी शब्दच दिला

तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीने भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला गेला. मात्र तो टाईप करण्यात आला नव्हता किंवा छापण्यात आलेला नव्हता. तर ही राज्यघटना हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत हस्तलिखित स्वरूपात लिहिलेली आहे. त्याचं लेखन हे प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी केलं. नंतर त्याचे डेहरादूनमधून प्रकाशन करण्यात आलं.

‘महायुतीकडून ओबीसी मंत्र्यांची अवहेलना’, भुजबळांना ध्वजारोहणाचा मान नसल्यानं वटेट्टीवारांचे टीकास्त्र

तसेच आपल्या संविधानांवर कोरलेल्या विविध रंगछटा आणि चित्र देखील छापण्यात आलेली नसून पश्चिम बंगालमधील रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्था शांतिनिकेतनच्या कलाकारांनी आपल्या हातांनी ते सर्व बनवलेला आहे. बेओहर राम मनोहर सिन्हा आणि नंदलाल बोस यांनी आपल्या भारतीय संविधानाचा प्रत्येक पान सजवलेला आहे.

Ajay Devgan च्या शैतानचा टीझर रिलीज; दिड मिनिटांमध्ये आर माधवच्या डायलॉग्जने उडवला थरकाप

तसेच हस्तलिखित स्वरूपात निर्माण केलेली आपली भारतीय राज्यघटना ही जतन करून ठेवण्यासाठी तिच्या मूळ प्रति हा भारतीय संसदेच्या ग्रंथालयात विशेष हेलियमने भरलेल्या पेट्यांमध्ये जतन करून ठेवण्यात आलेला आहेत. तसेच राज्यघटनेच्या अंतिम प्रतिबनवेपर्यंत तब्बल 6.4 मिलियन रुपये एवढा खर्च आलेला आहे.

तर भारतातील लोकशाही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आणि भारतीय राज्यघटना ही जगातील सगळ्यात मोठी राज्यघटना आहे कारण यामध्ये तब्बल एक लाख 17 हजार 369 शब्द आहेत. तर आपली राज्यघटना बनवण्यासाठी दोन वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी लागलेला आहे.

follow us