नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्याकडून बजेट सादर करण्यास सुरूवात झाली आहे. भाषणाच्या सुरुवातीला त्या म्हणाल्या, 2023-24 साठीचा अर्थसंकल्प मी सादर करत आहे. यामध्ये त्यांनी शिक्षण क्षेत्रासाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या त्या म्हणाल्या…
सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आणि तरूणांसाठी नॅशनल डिजीटल लायब्रेअरी स्थापन करण्यात येणार आहे. या डिजीटल लायब्रेअरीमध्ये सर्व भाषांतील महत्वाची पुस्तकं ठेवली जातील. जेणे करून लहान मुलं आणि तरूणांना त्यांच्या आवडीची सर्व पुस्तक वाचण्यासाठी आणि आभ्यासाठी उपलब्ध होतील.
त्याचबरोबर त्या पुढे म्हणाल्या, नॅशनल डिजीटल लायब्रेअरीपर्यंत सर्वांना पोहचवण्यासाठी लहान मुलं आणि तरूणांना प्रोत्साहित करण्यात येईल. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या मदत घेण्यात येणार आहे. उपयुक्त पठन सामग्री देने के लिए छात्रों और युवाओं से जुड़ने का प्रयास किया जाएगा।
त्याचबरोबर 2014 पासून आतापर्यंत स्थापन करण्यात आलेल्या 157 मेडिकल कॉलेज सह-संस्थांच्या रूपात 157 नव्या नर्सिंग कॉलेजांची स्थापना करण्यात येईल. मेडिकलच्या अभ्यासासाठी बहुविध विषयांच्या साहित्याची व्यवस्था करण्यात येईल.
ज्या एनजीओ शिक्षण क्षेत्रासाठी प्रोत्साहन देण्याचं काम करत आहेत. त्यांशी जोडले जाणे या वर्षीच्या बजेटचा मुख्य उद्देश आहे. शिक्षकांसाठी पुढील वर्षीपर्यंत चांगले आणि आधुनिक टीचर्स ट्रेनिंग सेंटर उघडण्यात येणार आहेत.
38 हजार 800 शिक्षकांची नियुक्त आदिवासी विकास मिशन अंतर्गत होणार आहे. एकलव्य निवासी शाळेच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. यासाठी 15 हजार कोटींची तरतुद करण्यात आली आहे.
तरूणांसाठी डीबीटी स्कीम सुरू करण्यात येणार प्रधानमंत्री कौशल विकास योजना 4.0 ची सुरूवात पुढील 3 वर्षांत केली जाईल. त्यात इंडस्ट्री फोकस्ड कोर्सेस लॉंच होतील, ज्यामध्ये रोबोटिक्स, कोडिंग, यांचा समावेश करण्यात येणार. युनिफाईड डिजिटल इंडिया प्लॅटफॉर्मच्या स्थापनेसह कौशल विकासाला गति देण्यात येईल. त्याचबरोबर नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम सुरू करण्यात येईल.