Download App

Road Accident : टायर फुटला अन् डंपरला धडकून कार पेटली; 8 प्रवाशांचा जळून मृत्यू

Road Accident : उत्तर प्रदेशातील बरेली येथे शनिवारी रात्री भीषण अपघात (Road Accident) झाला. या अपघातात 8 प्रवासी जळून मृत्यूमुखी पडले. हा अपघात बरेली-नैनिताल महामार्गावर शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडला. मारुती इर्टिगा कारचा टायर फुटून कार दुभाजक पार करून समोरून येणाऱ्या डंपरला धडकली. पुढे कार लॉक होऊन कारला आग लागली. त्यामुळे आतील प्रवाशांना बाहेर येता आले नाही. या आगीत 8 प्रवासी अक्षरशः जळून ठार झाले. या मयतांमध्ये एक लहान मुलाचाही समावेश आहे. या अपघाताची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमधून प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर येथील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Road Accident : कुटुंबावर काळाचा घाला! भीषण अपघातात तिघे ठार, 5 जण जखमी

अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. मात्र कारमधील प्रवाशांना वाचविण्यात यश आले नाही. कारमधील सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या मयतांपैकी तिघांची ओळख पटविण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील प्रवासी एक लग्न समारंभ आटोपून आपल्या घरी निघाले होते. त्याचवेळी हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोजीपुराजवळ कार ट्रकवर आदळून हा अपघात झाला. त्यानंतर कार बरेच अंतर फरफटत गेला आणि पुढे कारला आग लागली. अपघातानंतर कारचे दरवाजे लॉक झाले त्यामुळे आतील प्रवाशांना बाहेर येता आले नाही. आगीत त्यांचा जळून मृत्यू झाला. प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पोस्टमार्टेमसाी पाठविण्यात आले आहेत. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Road Accident : दसरा मेळाव्याहून परतणाऱ्या शिवसैनिकांचा भीषण अपघात; 25 जखमी

रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातातही असेच घडले होते. गौरी गणपतीच्या सणासाठी कुटुंब पुण्याहून अमरावतीकडे निघाले होते. समृद्धी महामार्गावर असताना अचानक वन्यप्राणी आडवा आला. या प्राण्याचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात कार तीन वेळा पलटी झाली. कारची वेगात होती. त्यामुळे वेगातच पलटी झाली. या अपघातात कुटुंबातील महिला ठार झाली. तर अन्य तीन प्रवासी जखमी जखमी झाले. या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे.

Tags

follow us