Road Accident : दसरा मेळाव्याहून परतणाऱ्या शिवसैनिकांचा भीषण अपघात; 25 जखमी

Road Accident : दसरा मेळाव्याहून परतणाऱ्या शिवसैनिकांचा भीषण अपघात; 25 जखमी

Road Accident : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काल विजयादशमीनिमित्त (Road Accident) दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यावरून (Dasara Melawa) परतत असणाऱ्या शिवसैनिकांच्या बसला भीषण अपघात झाला. मुंबई-आग्रा महामार्गावरील शहापूरजवळ वाहनांचा विचित्र अपघात झाला. आज मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातात 25 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सर्व जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरूआहेत.

मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरजवळ शिंदे गटाची बस मेळावा उरकून मुंबई ते सिल्लोड परतीचा प्रवास करत होती. रात्रीच्या सुमारास शहापूरजवळ या बसला मागील बाजूने ट्रकची जोरदार धडक बसली. त्यानंतर बस दुभाजकांवर आदळून अपघात झाला. त्यानंतर मागून येणाऱ्या इतर बसही एकमेकांवर धडकल्या. या विचित्र अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

प्रत्येक वेळी कानफाट फोडलेय, पण निर्लज्जपणाने गाल चोळत…; ठाकरेंनी नार्वेकरांना फटकारले !

ट्रक आणि एक बस थेट उड्डापुलावरील साईड दुभाजक तोडून उड्डाणपुलाखालील रस्त्यावर कोसळल्या तर इतर दोन बसचेही मोठे नुकसान झाले. या अपघातात काही जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. यातील काही शिवसैनिकांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. तसेच वाहतूक कोंडी सोडविण्यातही मदत केली.

रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातातही असेच घडले होते. गौरी गणपतीच्या सणासाठी कुटुंब पुण्याहून अमरावतीकडे निघाले होते. समृद्धी महामार्गावर असताना अचानक वन्यप्राणी आडवा आला. या प्राण्याचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात कार तीन वेळा पलटी झाली. कारची वेगात होती. त्यामुळे वेगातच पलटी झाली. या अपघातात कुटुंबातील महिला ठार झाली. तर अन्य तीन प्रवासी जखमी जखमी झाले. या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे.

Road Accident : भीषण अपघात! ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत तिघे जागीच ठार

रस्त्याच्या कडेला पायी (Road Accident) जाणारी माणसेही असतात. गाव किंवा रहदारीचा परिसर आला की वाहनाचा वेग मर्यादित करणे आवश्यक असते. तसेच रस्त्याच्या कडेला कुणी आहे का हे देखील चालकांना पहावे लागते. मात्र, बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष होते. अंतर लवकर पार करण्याच्या नादात अपघात घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देण्याची आणि वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube