संघप्रमुख मोहन भागवत ‘जेन झी’शी संवाद साधणार, युवा-नेतृत्व परिषदेचे NMACC’मध्ये आयोजन

वांद्रे-कुर्ला संकुल येथील निता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात 'जनरेशन झी'आणि 'जनरेशन अल्फा'च्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

News Photo   2026 08 03T163755.293

युवा-नेतृत्व परिषदेचे NMACC'मध्ये आयोजन; सरसंघचालक मोहन भागवत साधणार संवाद

भारतातील तरुण पिढी आज लोकशाही (RSS) नेतृत्व आणि राष्ट्रउभारणीच्या चर्चांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत असतानाच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत 6 ऑगस्ट रोजी मुंबईत तरुण पिढीशी थेट संवाद साधणार आहेत.

वांद्रे-कुर्ला संकुल येथील निता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात ‘जनरेशन झी’आणि ‘जनरेशन अल्फा’च्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनायटेड नेशन्सच्या 15 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या भव्य वार्षिक चॅम्पियनशिप परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सरकारकडून दिलेले आश्वासन पाळण्यात विलंब; अभिजीत दिपके विद्यार्थ्यांसह पुन्हा मैदानात उतरणार

या तीन दिवसीय परिषदेत देशभरातील 100 हून अधिक शहरांमधील 15 ते 19 वयोगटातील तब्बल 2,000 पेक्षा जास्त हायस्कूल आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ही परिषद जगातील सर्वात मोठ्या युवा-नेतृत्वाखालील संमेलनांपैकी एक मानली जाते.

2011 मध्ये ऋषभ शाह यांनी स्थापन केलेले आयआयएमयूएन (IIMUN) हे ‘भारत’ या संकल्पनेचा जागतिक पातळीवर प्रसार करणारे व्यासपीठ आहे. गेल्या 15 वर्षांपासून 15 ते 24 वयोगटातील तरुणच ही संस्था पूर्णपणे चालवत आहेत. या व्यासपीठावरून घडलेले अनेक तरुण पुढे जाऊन लोकप्रतिनिधी, आयएएस, आयपीएस अधिकारी, वकील, लेखक आणि उद्योगपती बनले आहेत.

आयआयएमयूएनच्या सल्लागार मंडळात उद्योग, न्यायव्यवस्था आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे. यामध्ये उद्योगपती अजय पिरामल, दीपक पारेख, नादिर गोदरेज, खासदार डॉ. शशी थरूर, माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, चित्रपट दिग्दर्शक करण जोहर, माजी लष्करप्रमुख आणि ऑलिम्पिकपटू पी. टी. उषा यांसारख्या नामवंत व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे.

Exit mobile version