EPFO Rule Change : कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात ईपाएफओने (EPFO) आता एक मोठा निर्णय घेतला आहे. उमंग मोबाइल अॅपच्या माध्यमातून युनिव्हर्सल अकाउंट नंबर अॅक्टिवेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नव्या बदलाची अंमलबजावणी येत्या 7 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या निर्णयाची माहिती देताना ईपीएफओने स्पष्ट केले आहे की आता फक्त आधार फेस ऑथिंटिकेशनच्या माध्यमातून उमंग अॅपद्वारेट युएएन अॅक्टिवेट करावा लागणार आहे. या पद्धतीने कार्यवाही केली नाही तर अशा सदस्यांसाठी सेवा बंद केली जाईल.
कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, EPFO मध्ये मोठा बदल, नॉमिनीला मिळणार 50,000 रुपये
EPFO ने आपल्या नियमांत मोठा बदल केला आहे. 30 जुलै रोजी एक परिपत्रक जारी करण्यात आले होते. या परिपत्रकानुसार आता सभासदांसाठी आधार बेस्ड फेस ऑथिंटिकेशच्या माध्यमातून UAN जनरेट करणे बंधनकारक राहणार आहे. काही विशेष परिस्थितीतच जुन्या पद्धतीने युनिव्हर्सल अकाउंट नंबर जनरेट करणे ग्राह्य धरण्यात येईल. अन्य सर्व नवीन युएएन Aadhaar Face Authentication टेक्निकच्या माध्य्मातून जनरेट केले जाणार आहेत. यासाठी सर्व प्रोसेस UMANG अॅपच्या माध्यमातूनच होणार आहे आणि एम्प्लॉयरशी संपर्काची गरज राहणार नाही.
या नियमाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कर्मचारी आता स्वतःच UAN जनरेट आणि अॅक्टिव्हेट करू शकतील. अॅक्टिवेट झाल्यानंतर मोबाइलच्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन UMANG App आणि आधार फेस आयडी अॅप डाऊनलोड करावे लागेल. या नव्या टेक्निकद्वारे UAN जनरेट करण्यासाठी युजरकडे त्याचा आधारकार्ड नंबर, रजिस्टर्ड मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त चेहरा स्कॅन करण्यासाठी Aadhaar Face RD App एकदा तयार झाले की ही प्रक्रिया मोबाइलच्या माध्यमातून काही मिनिटांतच करता येईल.
आधार बेस्ड ऑथिंटिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर या पद्धतीत केला जातो. यामुळे UAN कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुलभ आणि सुरक्षित होते. कारण यात युजरची माहिती थेट आधार डेटाबसेमधून घेता येते.
PF मधून कधी आणि किती पैसे काढता येणार? जाणून घ्या EPFO चे नवीन नियम