PF मधून कधी आणि किती पैसे काढता येणार? जाणून घ्या EPFO चे नवीन नियम

PF मधून कधी आणि किती पैसे काढता येणार? जाणून घ्या EPFO चे नवीन नियम

EPFO New Rules : जर तुम्ही देखील नोकरी करत असाल तर तुमच्याकडे पीएफ खाते (PF Account) असणे आवश्यक आहे. या खात्यात दरमहा तुमच्या पगारातून आणि कंपनीकडून काही रक्कम जमा केली जाते. या पैशांचा वापर तुम्ही भविष्यात करु शकतात मात्र कधी कधी तुम्हाला पीएफचे पैसे काढण्याची गरज निर्माण होते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? पीएफ पैसे काढण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच ईपीएफओ (EPFO) काही नियम लागू केले आहे. तुम्ही पीएफचे पैसे कधी आणि किती काढू शकतात. याबाबत लागू असणाऱ्या नियमांबद्दल जाणून घ्या.

लग्नासाठी पीएफ काढू शकता

ईपीएफओकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कर्मचारी लग्नासाठी पीएफमधून पैसे काढू शकतात. मात्र यासाठी तुम्हाला किमान 7 वर्ष पीएफओचे सदस्य असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या दरम्यान तुमच्या खात्यात किमान 1000 रुपये असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या योगदानाच्या (व्याजासह) 50% पर्यंत रक्कम काढू शकता. हे पैसे तुमच्या, भावंडांच्या किंवा मुलांच्या लग्नासाठी वापरले जाऊ शकतात.

मुलांच्या शिक्षणासाठी

लग्नाबरोबर तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी देखील पीएफमधून पैसे काढू शकतात. यासाठी देखील 7 वर्षांचे सदस्यत्व आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या योगदानाच्या 50% पर्यंत (व्याजासह) पैसे काढू शकता, परंतु ही सुविधा आयुष्यात फक्त 3 वेळा उपलब्ध आहे.

घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी

ईपीएफओने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्हाला घर बांधायचे असेल किंवा खरेदी करायचे असेल तर तुम्ही ईपीएफओमधून पैसे काढू शकतात. यासाठी तुम्हाला ईपीएफओचे पाच वर्षांचे सदस्यत्व आवश्यक आहे. घराच्या दुरुस्तीसाठी, घर बांधल्यानंतर 5 वर्षांनी पैसे काढता येतात. जर अतिरिक्त दुरुस्तीची आवश्यकता असेल, तर पहिल्या पैसे काढल्यानंतर 10 वर्षांनी पैसे काढता येतात. यासाठी फक्त एकदाच पैसे काढण्याची परवानगी आहे.

वैद्यकीय गरजांसाठी

वैद्यकीय गरजांसाठी तुम्ही पीएफमधून गरज पडल्यास कधी देखील पैसे काढू शकतात. अगदी ईपीएफमध्ये सामील झाल्यानंतर देखील तुम्हाला वैद्यकीय गरजांसाठी पीएफमधून पैसै काढता येतात.

निवृत्तीपूर्वी

ईपीएफओ नियमांनुसार जर तुम्ही निवृत्तीच्या एक वर्ष आधी असाल, तर तुम्ही तुमच्या एकूण पीएफ फंडाच्या 90% पर्यंत पैसे काढू शकता. ही सुविधा फक्त एकदाच उपलब्ध आहे.

आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींना मिळणार 1 लाखांपर्यंत कर्ज; ‘या’ बँकेची मोठी घोषणा

कर्जाची परतफेड करण्यासाठी

जर तुम्ही घर खरेदी करण्यासाठी, बांधण्यासाठी किंवा दुरुस्ती करण्यासाठी कर्ज घेतले असेल, तर तुम्ही त्याचे थकित मुद्दल आणि व्याज फेडण्यासाठी पीएफमधून पैसे काढू शकता. यासाठी किमान 10 वर्षांचे ईपीएफ सदस्यत्व आवश्यक आहे. तुम्ही 36 महिन्यांचा मूळ पगार आणि डीए किंवा कर्मचारी-नियोक्त्याचे एकूण योगदान किंवा थकित कर्जाची रक्कम (जे कमी असेल ते) काढू शकता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube