Russian Woman Found In Forest : एका घनदाट जंगलात (Forest) एक रशियन महिला आढळली. तिच्यासोबत तिच्या दोन लहान मुली देखील होत्या. ही धक्कादायक घटना कर्नाटकमधून समोर आली आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमटा तालुक्यात (Karnataka) रामतीर्थ पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात एक रशियन महिला पोलिसांना 9 जुलै रोजी आढळून आली. विशेष बाब म्हणजे ही महिला गेली अनेक वर्षे या जंगलातील गुहेत आपल्या मुलींसह वास्तवास होती. पोलिसांना गस्त घालताना या महिलेचा (Russian Woman) शोध लागला. महिलेची चौकशी केली असता तिने सांगितलेली कारणं आश्चर्यचकित करणारी आहेत.
ही महिला कोण?
या महिलेचे नाव नीना कुटीना असे आहे. 40 वर्षांची ही महिला रशियन नागरिक असून तिचे इथले नाव मोहिनी असल्याचे तिने सांगितले. तिला दोन (Russian Woman Found In Forest )मुली आहेत. एका मुलीचे वय 6 वर्षे तर दुसरीचे वय साधारण 4 वर्षे आहे. या दोन्ही मुली तिच्याचसोबत या गुहेत वास्तवास होत्या. ही महिला 2017 साली गोव्याला आली होती. त्यानंतर ती कर्नाटकमधील गोकर्ण गावात पोहोचली.
Bihar Crime : भाजप पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या; कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न
जंगलातील वास्तवाची कारणे
नीना हिंदू धर्म आणि भारतीय अध्यात्म यांवर अतिशय प्रभावित झाली होती. या गावात आल्यानंतर तिला अध्यात्माची ओढ लागली. त्यानंतर इथेच जंगलात तिने एका नैसर्गिक गुहेत साधे घर बांधले. वास्तव करण्यास सुरूवात केली. या गुहेतच तिने रूद्र मूर्तीची स्थापना केली, देवाचे फोटो ठेवले. त्यानंतर ती आपला संपूर्ण वेळ पूजा अन् ध्यानधारणा करण्यास घालवू लागली. आध्यात्मिक शांतीसाठी ध्यानधारणा करते, अशी माहिती तिने पोलिसांना दिली आहे.
पोलिसांनी महिलेला कसं शोधलं?
पर्यटक सुरक्षित आहेत की नाही, हे तपासण्यासाठी रामतीर्थ डोंगरावर पोलीस गस्त घालत होते. यावेळी त्यांना धोकादायक अशा भूस्सखलनाच्या जवळ असलेल्या एका गुहेत काही संशयास्पद हालचाली दिसल्या. तपासानंतर या गुहेत नीना दोन मुलींसह राहत असल्याचे पोलिसांना आढळले. सुरुवातीला नीनाने कुठलीही ओळख देण्यास नकार दिला. मात्र, महिला बालकल्याण विभागातील एका महिलेसमोर नंतर तिने सर्व माहिती सांगितली. नीनाने पासपोर्ट हरवल्याचे पोलिसांना सांगितले. परंतु पोलिसांनी शोध घेतल्यानंतर तिचा पासपोर्ट अन् इतर महत्वाची कागदपत्रे मिळाली. नीनाचा व्हिसा 2017 रोजीच संपल्याचे समोरे आले. त्यामुळे ती गेली आठ वर्षे बेकायदेशीररित्या भारतात राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासलं, वाचा काय अन् कसं घडलं?
आता पुढे काय?
नीना सुरूवातीला जंगल सोडण्यास तयार नव्हती. पोलिसांनी खूप समजूत घातल्यानंतर ती जंगल सोडायला तयार झाली. यानंतर तिला शंकरा प्रसाद फाऊंडेशन या एनजीओकडे सुरक्षितरित्या सोपवण्यात आले. 14 जुलैला या महिलेला FRRO (Foreigners Regional Registration Office) च्या कार्यालयात हजर केले जाईल आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन तिला तिच्या मुलींसह रशियात पाठवले जाईल, असे सांगण्यात आले आहे. सध्या ही महिला आणि तिच्या दोन्ही मुली सुरक्षित आहेत, असे पोलिसांनी स्पष्ट केलं.